गटविकास अधिका-याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा .
कोरोनाचा विसर पडलेल्या पदाधिकारी अधिका-यांवर कारवाईची मागणी , सर्वत्र संताप
महाड – महाडमध्ये कोरोनाग्रस्त महिलेचा काल रात्री म्रुत्यू झाल्याने तालुक्यात भितीचे वातावरण असतानाच याबाबत कुठलेही गांभिर्याचे भान नसलेल्या महाड पंचायत समितीच्या पदाधिकारी आणि अधिका-यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात चक्क मटणाची पार्टी झोडली . पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांचा वाढदिवस आज पंचायत समिती कार्यालयात मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला .
यानिमित्ताने पंचायत समितीच्या सभाग्रुहात तसेच सभापतींच्या दालनामध्ये मेजवानीच्या पंगती झोडल्या गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे शासनाची महसुल , पोलीस , आरोग्य यंत्रणा चोवीस तास कोरोनाशी सक्रियपणे लढा देत असतानाच दुसरीकडे पंचायत समितीच्या सभापती तसेच अन्य पदाधीकारी आणि अधिकारी यांनी मात्र अशा प्रकारे मटणाच्या पार्टीला हजेरी लावली या घटनेबद्दल तिव्र संताप व्यक्त केला जात आहे .
या पार्टीला सभापती तसेच सर्व पंचायत समिती सदस्य , पंचायत समितीचे अधिकारी तसेच सर्व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते . कोरोनाच्या पार्शभुमिवर सर्व नियम आणि शासकिय आदेश बासनात गुंडाळून एका शासकिय कार्यालयातच भरदिवसा या पार्टीला उपस्थित असलेल्या पदाधिकारी राजकिय पक्षांचे कार्यकर्त् तसेच अधिका-यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे . रायगडच्या जिल्हाधिकारी निघी चौधरी ह्या याबाबत काय कारवाई करणार ? याकडे लक्ष लागले आहे.