Home रायगड मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे आदिवासी वाडीतील लोकांना एक हात मदतीचा

मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे आदिवासी वाडीतील लोकांना एक हात मदतीचा

152

कर्जत जयेश जाधव

देशात कोरोनासारख्या आजाराने थैमान घातले आहे या विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने लाॅकडाऊन लागू करण्यात आला

असून मागील एक महिन्यापासून आदिवासी बांधव आपल्या घरीच राहून शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करीत आहेत त्यामुळे सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असल्या कारणाने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे म्हणून अशा संकटात सापडलेल्या आदिवासी बांधवांना मदतीचा हात पुढे करून सावरायला हवंय या हेतूने सामाजिक बांधिलकीची जोपासत कर्जतमधील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे भिसेगाव आदिवासी वाडीतील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सविता जगताप, कर्जत पोलिस ठाणे महिला समुपदेशक सोनाली मोरे, राजीव पवार भिसेगाव पोलिस पाटील संजय हजारे पत्रकार जयेश जाधव ,नागेश ठाकरे , मधुरा मोरे,आदींनी भिसेगाव आदिवासी वाडीतील ४७ कुटुंबांना घरोघरी जाऊन वाटप करून मदतीचा हात पुढे केला आहे.