कर्जत : जयेश जाधवसध्या देशात कोरोना (कोविड १९) या विषाणुने धुमाकूळ घातला असून सर्वंत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.कोरोनाच्या या जैविक युध्दात अश्या हातावर पोट भरणा-या गोर गोरगरीब व गरजू कामगार व त्यांचे संपुर्ण कुटूंब यांचे हातावर असलेले पोट या कोरोना संकटामुळे काही कामगार बांधवांवर व मोलमजुरी करून खाणारे यांना पुरेसे अन्न मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.यातच लाॅकडाऊनची सूची वाढतच चालल्याने हातावर पोट असणाऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक संकेत भासे यांनी दहिवली संजयनगर येथे धान्य वाटप करण्यात आले.
या धान्य वाटप प्रसंगी कर्जत नगरपरिषदेचे नगरसेवक संकेत भासे,प्रणय पिंगळे,विनायक गायकवाड, ओंकार पिंगळे,प्रतीक चौधरी,सुहास दिघे,राज जाधव, इंद्रजित लाड,राजेश हिली,स्वप्नील शाहू,परशुराम लोभो,विनय सोळंकी आदी ग्रामस्थ उपस्तीत होते.
आज कर्जत नगरपरिषदेच्या हद्दीतील वार्ड क्र. २ प्रभागामधील दहिवली संजयनगर विभागातील गोर गरीब व गरजू कुटुंबाना आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशन च्या माध्यमातून अन्न धान्य वाटप करण्यात आले.हे काम नव्हे जबाबदारी आहे आमची, तसेच वार्ड क्र.२ प्रभागातील कुटुंबातील सर्व लोकांची नेहमी मदत करत राहणार व या पुढेही मी कोणतेही संकट आले तरी देखील अशीच गोर गरीब व गरजूंना मदतीचा एक हात पुढे नेहमीच व सदैव त्यांच्या पाठीशी उभे रहाणारच “हे कर्तव्यच आहे माझे” असे कर्जत नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक संकेत भासे दहिवली संजयनगर वार्ड क्र.२ मध्ये गरजू कुटूंबियांस धान्य वाटप करते वेळी ते बोलत होते.