Home जळगाव ७ वर्षाच्या मोहम्मद साद याने ठेवला पहिला उपवास ( रोजा )

७ वर्षाच्या मोहम्मद साद याने ठेवला पहिला उपवास ( रोजा )

206

रावेर (प्रतिनिधी)

पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण करून रावेरातील मोहम्मद साद शेख सादीक (वय ७) याने आठवा रमजानचा रोजा आपल्या जीवनातला पहिला रोजा ठेवला.
सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी पाच वाजेपासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अन्नाच्या एक कण आणि पाणी च्या आधारावर उपाशी पोटी राहून यांने (अल्लाह) ईश्वर प्रती श्रद्धा व्यक्त केली.
भारत देश कोरोना मुक्त होण्यासाठी अल्लाह ला या मुलाने साकडे घातले.
एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल या मुलाचा सर्वत्र अभिनंदन होत आहे. तो पत्रकार शरीफ शेख यांचा पुतण्या आहे.