Home मराठवाडा भारतीय जैन संघटनेच्या वतीने जालना जिल्हयात पाच ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न

भारतीय जैन संघटनेच्या वतीने जालना जिल्हयात पाच ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न

130

बदनापूर – प्रतिनिधी

जालना – कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्यामुळे व विविध ठिकाणच्या रूग्णालयातील रक्तसाठा कमी झालेला असल्यामुळे भारतीय जैन संघटनेच्या वतीने जालना जिल्हयात पाच ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून आज पहिल्या दिवशी बदनापूर येथे झालेल्या रक्तदान शिबिर घेण्यात आले.

राज्यात रक्ताचा पुरवठा कमी पडू नये यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व विविध सामाजिक संघटनांनी रक्तदान करण्याचे नागरिकांना आवाहन केलेले होते. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून त्या अनुषंगाने लॉकडाऊनही सुरू आहे. त्यामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांनी पुढील काळात रक्ताचा तुटवडा होऊ नये, याकरता नागरिकांना रक्तदानाचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जैन संघटना, पीपीसीआर, जनरल मर्चंट व व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने 9 मे रोजी बदनापूर येथे, 11 मे रोजी तीर्थपुरी, 12 मे रोजी अंबउ, 14 मे रोजी कुंभार पिंपळगाव, 15 मे रोजी भोकरदान, 17 मे रोजी राजूर या ठिकाणी सकाळी 8 ते 12 पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून आज पहिल्या दिवशी बदनापूर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले

यावेळी डॉ. हरीश तातेड, डॉ. संतोष वाघ, डॉ. गौरव तातेड, गजानन गिते, संजय उनगे, रतनलाल सकलेचा, आनंद पारख आदींची प्रमुख उपस्थिती होती. उर्वरीत ठिकाणी दिनांकानुसार हे रक्तदान होणार असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन हस्तीमल बंब, ॲङ अभय सेठिया, शिखरचंद लोहाडे, आनंद पारख आदींनी केले आहे. आज पहिल्या दिवशीच या आवाहानाला प्रतिसाद देत बदनापूर शहरातील नागरिक आणि व्यापारी महासंघाच्या व भारतीय जैन संघटनेच्या सभासदांची मोठया संख्येने रक्तदान केले. शासकीय परवानगी घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासत, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करत हे रक्तदान शिबिर पार पडत असून. शनिवारी झालेल्या बदनापूर येथील शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला हे रक्त जनसेवा रक्तपेढीला देण्यात आले. शिबिराच्या ठिकाणी येणाऱ्या रक्तदात्यांची थर्मल स्क्रीनिंग आणि निर्जनतुकीकरन करून आत प्रवेश देण्यात येत होता. तसेच मास्क लावण्याचे बंधन व सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्यात येत होते.