सय्यद तौसिफ
सिंदखेडराजा
: सिंदखेड राजा तालुका अंतर्गत दुसरबीड येथील समाजसेवेची जाण असलेल्या अहमद रजा ग्रुपचा तरुणांनी कोरोणा संसर्ग रोगामुळे लॉक डाऊन काळात रोजगार गमावलेले मजूर, विधवा,परित्यक्त्या महिला, अपंग व निराधार लोकांना सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या ग्रुपच्या वतीने आपले काहीतरी योगदान असले पाहिजे. या हेतूने प्रेरित होऊन गरीब गरजू व निराधार लोकांना किराणा सामान आणि सुख्या मेव्याचे चाळीस किट चे वितरण केले.
सदर किट मध्ये तेल, साखर , चहा पत्ती, मसाले ,हळद , बिस्किट , या सह स्वयंपाक घरात लागणार्या आवश्यक वस्तूंचा समावेश होता. तसेच खोबरे, खारीक, बदाम, काजू ,मनुके या सुखा मेव्या चाही समावेश करण्यात आला होता.
अत्यंत गरीब आणि गरजू लोकांनाच ह्या कीड चे वाटप करण्यात आले हे विशेष.
खऱ्या गरजू आणि अडचणीत सापडलेल्यानां हे दान करण्यात आल्यामुळे अहमद रजा ग्रुप च्या तरुणांचे कौतुक होत आहे.
*अहमद रजा ग्रुपच्या दातृत्वा ला सलाम*
*सर्वसामान्यांची जाण असलेला ग्रुप*
*सर्वसामान्य आणि अडचणीत सापडलेल्या लोकांची मदत केल्याने विशेष समाधान मिळते असे या ग्रुपच्या सदस्यांनी बोलून दाखविले*
*विशेष म्हणजे या ग्रुप चा कोणताच सदस्य कमवता नाही. 18 ते 20 वयोगटातील हे सर्व तरुण आहेत. आपल्या पॉकेटमनी मधून वाचवलेल्या पैशांमधून या तरुणांनी गरजू लोकांची मदत केली हे विशेष*