Home सोलापुर अक्कलकोट च्या नगराध्यक्षांनी उंचावले कोरोना योध्यांचे मनोबल.

अक्कलकोट च्या नगराध्यक्षांनी उंचावले कोरोना योध्यांचे मनोबल.

213

प्रत्यक्ष भेटून केली विचारपूस
पुष्पवृष्टीने दिले प्रोत्साहन…

वागदरी / नागप्पा आष्टगी

अक्कलकोट – स्वामी समर्थांच्या पुण्यनगरीत लॉक डाऊन च्या काळात कोरोना प्रतिबंधासाठी मागील दीड महिन्यांपासून कर्तव्य बजावणाऱ्या विविध क्षेत्रातील कोरोना योध्यांचे मनोबल उंचावण्यासाठी अक्कलकोट च्या नगराध्यक्षा शोभाताई खेडगी आणि खेडगी परिवाराच्या वतीने प्रोत्साहनपर पुष्पवृष्टी करण्यात आली.

अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन शिवशरण खेडगी यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या उपक्रमाअंतर्गत अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय व फिव्हर क्लिनिक येथे सेवा देणारे डॉक्टर्स, परिचारिका, व अन्य कर्मचारी, अक्कलकोट उत्तर व दक्षिण पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचारी, अक्कलकोट नगरपरिषदेतील कार्यालयीन कर्मचारी व सफाई कामगार, प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन येथे परजिल्ह्यातून व परराज्यातून येणार्या नागरिकांसाठी पास वाटप करणारी टीम, आणि अक्कलकोट शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर थांबून कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी या सर्वांच्या अमूल्य कार्याचे कौतुक करण्याच्या हेतूने सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करत नगराध्यक्षा शोभाताई खेडगी व वैशाली कलशेट्टी यांनी पुष्पवृष्टी केली.

या अभिनव व प्रेरणादायी उपक्रमाबद्दल ग्रामीण रुग्णालय येथील डॉ. अशोक राठोड, फिवर क्लिनिक चे डॉ. प्रदीप घिवारे, उत्तर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कलाप्पा पुजारी, दक्षिण पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक, पास वाटप विभागाचे राजशेखर नागणसुरे, पोलीस उपनिरीक्षक सोनाली गोडबोले-पाटील आदिंनी समाधान व्यक्त केले.