घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे
जालना – जिल्ह्यातील बदनापुर , जालना , भोकरदन,जाफ़्राबाद ,घनसावंगी मंठा,परतुर तालुक़्यातील शेतशिवार अवकाळी वादळी, गारांच्या पावसाने झोडपला.आकस्मिक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिसरात मे रोजी दुपारी जोरदार वादळी पावसासह जबरदस्त गारपीट झाली.साधारणतः एक तासभर निसर्गाचे हे रौद्ररूप पाहायला मिळाले. मेघ गर्जणेसह आलेल्या या अकल्पित अवकाळी पावसामुळे यावर्षी आधीच शेवटच्या घटका मोजत असलेल्या आंबा ,मोसंबी, केळी,पपई,टरबुज,कांदारोप पिकांचे नुकसान झाले. फळ बागाना फटका बसला आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. यात मका पिकाचे भिजून मोठे नुकसान झाले तर रानात असलेली जनावरे व पशुपक्षी गारपिटीच्या तडाख्यात सापडली.झाडे उन्मळून पडली. शेडनेटमध्ये असलेल्या पिकांसह नवीन लागवड करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लहान रोपांचेही मोठे नुकसान झाले.
आधीच कोरोनाच्या भितीने भयभीत झालेल्या लोकांची लाॅकडाउनने कोंडी केल्याने सर्व जनता हैराण आहे.त्यातच वेगवेगळ्यासंकटात सापडलेला शेतकरी राजा या नवीन संकटाने आणखीनच कोलमडून पडलाय. मा. जिल्हाधिकारी साहेब यानी तात्काळ तहसीलदार ,मंडळ अधिकारी , तलाठी, ग्रामसेवक याना आदेश देउन पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी माघनी शिव छावा प्रदेशअध्यक्ष गणेश कुलकर्णी , वार्ड क्र 4 बदनापूर चे भावी नगरसेवक पप्पू दादा चा वतीने केली जात आहे.