Home मराठवाडा कापूस खरेदी प्रकरणी शेतकरी संघटना महिला आघाडी करणार कापुस जाळा आंदोलन..

कापूस खरेदी प्रकरणी शेतकरी संघटना महिला आघाडी करणार कापुस जाळा आंदोलन..

218

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना – कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे , खरिप हंगाम तोंडावर येऊन ठेपला तरी शेतकऱ्यांच्या घरातील कापसाच्या गंज्या पडून आहेत.शासनाचे हे धोरण कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे नाही.कापुस खरेदी प्रकरणी शासनाच्या उदासीन धोरणाच्या निषेधार्थ शेतकरी संघटना महिला आघाडी २२ मे रोजी सकाळी ११ वाजता मुठभर कापूस जाळा आंदोलन करणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा गीताताई खांडेभराड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.या प्रसिद्ध पत्रकात नमूद करण्यात आले आहे कि, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या निवारणार्थ शासनाने सर्व कापूस जिनिंगवर कापसाची खरेदी सुरू करावी,एफ ए क्यूच्या तीनही ग्रेडचा कापूस खरेदी करण्यात यावा ,शासनाला कापूस खरेदी करणे शक्य नसल्यास भावांतर योजना लागू करावी, असे म्हटले आहे.