शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित…!
मायणी. ता.खटाव. जि.सातारा (सतीश डोंगरे ) – मायणी परिसरातील अद्यापही उपसा जलसिंचन योजने पासून कोसो मैल दूर आहे तारळी प्रकल्प अंतर्गत मुख्य कँनाँल ची व पोट पाठाची कामे अद्याप काही ठिकाणी अपूर्ण आहेत परंतु शेती पाण्याची गरज लक्षात घेऊन माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या अथक प्रयत्नांना यश येऊन मायणी सह सुर्याचीवाडी पिंपरी गोरेगाव मुरड वाक मोराळे या गावांना उरमोडी योजनेच्या अंवर्तनातून क्रमांक 26 बिंदू वरून पाणी मिळणार असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे अधिक माहिती देताना डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी सांगितले की तारळी योजनेचे अंतर्गत धोंडेवाडी येथे जलशेतु बांधताना अनेक समस्या निर्माण झाल्या हे ठेकेदार काम सोडून देण्याच्या तयारीत होता अशा वेळी शासनाचे दरवाजे वाजून या जलसेतू साठी वाढीव निधी मंजूर करून घेतल्याने सध्या या शेतीचे काम पूर्ण तावर आले आहे याप्रसंगी कार्यकारी अभियंता एस एस गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता राजेंद्र परुळेकर सनी चव्हाण आर के राजमाने यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या बैठक झाली आणि सध्या उरमोडीचे अवर्तन माण तालुक्यात सुरू आहे माण तालुक्यात पाणी बोंबाळे येथून 78 बिंदू वरून जाते तेथुन पाणी सोडण्यास मायणी येथील 26 बिंदूवर मोहरी चा मळा येथून समपातळी तून पडळकर यांच्या शेजारील पाजरतलाव येऊन दुसरा फाटा उर्वरित पाच गावांना मिळेल येत्या एक-दोन दिवसात पाणी येणार असल्याचे मायणीसह सहा गावातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत तसेच टेंभू योजनेचे पाणी एक जून पर्यंत मायनी तलाव येणार असल्याने चांदन नदी बारा महिने वाहती राहणार आहे कोरोनाच्या लाँकडाँऊन च्या काळात अनेक घरात बसले आहेत पण माजी आमदार दिलीपराव येळगावकर यांनी कामाचा धूमधडाका सुरू केल्याने सध्या डॉ.येळगावकर सामान्य जनतेचे सिंघम झाली आहेत या बैठकीस ग्रामपंचायत सदस्य सुरज पाटील ,राजू काबुगडे जगन्नाथ भिसे ,नितीन झोडगे ,वसंत निकम, राजाराम कचरे, महादेव ढवळे, दादा वाघमोडे शेतकरी उपस्थित होते.