नांदेड , दि. २२ ( राजेश एन भांगे ) नांदेड जिल्ह्यात सी.सी.आय.मार्फत कापूस खरेदी चालू आहे.पण ही खरेदी अत्यंत संथ गतीने चालू आहे ही खरेदी जलदगतीने करून शेतकऱ्यांचा संपुर्ण कापूस खरेदी करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी डाॅ. खल्लाळ यांच्याकडे केली.
देशात कोरोणा या महामारिचे संकट असल्यामूळे कापूस खरेदी उशिरा चालू झाली आहे. सी.सी.आय.मार्फत खरेदी करताना या ठिकानी खरेदिदार मनमानी करत कासवगतीने कापूस खरेदी करत आहेत.त्यामुळे 60% शेतकर्यान्कडे कापूस घरातच आहे.यामध्ये पहिल्या वेचनीचा कापूस तेवढा सी.सी.आय. खरेदी करत आहे दुसऱ्या व तिसऱ्या वेचनीचा कापूस सी.सी.आय.खरेदी करत नाहीत.त्यामूळे शेतकरी दुसऱ्या व तिसऱ्या वेचनीचा कापूस खाजगी व्यापार्यांकडे अत्यल्प भावात देत आहेत. भाव कमी असल्यामुळे शेतकरी खाजगी व्यापार्यांना आपला कापुस देण्यास इछूक नाहीत. आता काही दिवसात पेरणीचा हंगाम सुरू होईल त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचा सर्व कापुस सी.सी.आय.मार्फत खरेदी करुन बळीराजाला दिलासा दयावा अन्यथा शेतकरी आत्महत्या करातील त्यामुळे प्रशासनाने यात लक्ष घालुन सी.सी.आय.ची मनमानी व अनागोंदी कारभार थांबवुन शेतकर्याना मदत करावीअशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी निवेदनाद्वारे केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर सरचिटणीस युनूस खान,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुदखेड तालुकाध्यक्ष शिवानंद शिप्परकर , जिल्हा सरचिटणीस चक्रधर कळणे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस किनवट विधानसभा अध्यक्ष राहूल नाईक,अविनाश पवार आदी उपस्थित होते.
Home कृषि व बाजार प्रशासनाने सी.सी,आयचे मनमानी कारभार थांबवुन जलदगतीने शेतकऱ्यांचे संपुर्ण कापुस खरेदि करावे – ...