रेड झोन घोषित नागपुर येथुन परवानगी न घेता आले होते गावात….!!
ईकबाल शेख
वर्धा – जिल्हातील आर्वी तालुका येथिल मिर्झापुर नेरी या गांवात १) नामे मनिष रामचंद्र लसुंते वय (२७) वर्ष व २) नारायन नामदेवराव कोहरे वय (४२) वर्ष दोन्ही राहणार मिर्झापुर नेरी ता. आर्वी हे दोघे नागपुर येथुन कोरोणा विषाणु संबधाने रेड झोन घोषीत असतांना कोणत्याही कार्यालयाची शासकीय परंवांगी न घेता मिर्झापुर नेरी गांवात आले होते.
त्यांची वैध्यकीय तपासणी करुन त्यांना १४ दिवसा करीता मिर्झापुर नेरी प्रथमीक शाळेत काँरोनटाईन करण्यात आले होते. दिनांक २८ मे ला वरील दोन्ही ईसम हे गांवात फिरत असल्याची माहीती पोलीस पाटील यांनी दिली.
कोरोणा ग्राम विषाणु समीतीचे सातही सदस्य हे वरील ईसमांना पाहण्यासाठी मिर्झापुर नेरी येथे गेले असता वरील दोन्ही ईसमांनी कोरोणा ग्राम विषाणु समीतीचे सातही सदस्य यांना शिवीगाळ केली वरील दोन्ही ईसम हे काँरनटाईन असतांना गावात फिरुन कोरोणा साथ पसरविण्याची शक्यता आहे बाबत ग्रामपंचायत मिर्झापुर नेरी चे सचिव राजु गोवर्धनराव शेंदरे यांनी पोलीस स्टेशन आर्वीला येवुन तोंडी रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 231/20 कल 188, 269, 270, 504, 34 भादवी सहकलम 3 साथ रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 सह कलम 11 महाराष्ट्र कोवीड – 19 उपाय योजना अधिनीयम 2020 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
करीता ईसम नामे १) मनिष रामचंद्र लसुंते वय (२७) वर्ष २) नारायन नामदेवराव कोहरे वय (४२) वर्ष दोन्ही राहणार मिर्झापुर नेरी ता. आर्वी यांना कोवीड – 19 संस्थात्मक विलगीकरण कक्ष हैबतपुर आश्रम शाळा आर्वी येथे काँरनटाईन आलेले आहे. सदर गुन्हाची पुढील कार्यवाही पोउपनी गोपाल ढोले करित आहेत.