सतीश डोंगरे
मायणी – Dysp बी बी महामुनी साहेब यांचे मार्गदर्शना खाली मायणी पोलीसांची मोठी कारवाई, 6,57,600 रु चा मुद्देमाल जप्त
कारवाई पथक शहाजी गोसावी पोलीस उप निरीक्षक, पो ना खांडेकर,पो कॉ सानप,पो कॉ कोळी, पो कॉ सूर्यवंशी पो.कॉ. प्रविण तानाजी सानप वडूज पोलीस ठाणे अंकीत मायणी पोलीस दूरक्षेत्र ता.खटाव जि.सातारा यांनी सांगितलेली माहिती दिनांक 28/05/2020 रोजी साय.6.00 वा.चे सुमारास मायणी पोलीस दूरक्षेत्र येथे हजर असताना पोलीस उपनिरिक्षक गोसावी साहेब यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि,पडळ ते कलेढोण जाणारे रोडवरुन इनोव्हा कार नंबर एम एच 04 कक़ 1053 मधुन बेकायदा विदेशी दारुची चोरटी वाहतुक करुन घेवुन जाणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली आम्हा पोलीस स्टॉफला त्यांनी मिळाले बातमीचा आशय थोडक्यात समजावुन सांगीतला. व त्याकामी आपणास रेड करावयाची आहे. असे सांगतिले त्यावेळी पंच म्हणुन बोलविले इसम रेडकामी येणेस स्वखुशीने तयार झाले. त्यांनतर सदर रेडकामी लागणारे सर्व साहित्यासह मी स्वता:, पोउनि श्री गोसावी साहेब, पो.ना.908 खांडेकर पो.कॉ. 2367 कोळी, पो.कॉ.446 सुर्यवंशी असे आमचे खाजगी वाहन घेऊन विखळे ता खटाव गावचे हद्दीत विखळे फाटा- चोैक येथे आडोशाला जावुन थांबलो सांयकाळी 6.45 वाचे सु//स विखळे गावाकडुन एक इनोव्हा कार आल्याचे आम्हाला दिसले व आम्ही रोडवर येवुन सदर कारला थांबणेचा इशारा केला असता सदर कारवरील चालकाने सदरची कार थांबवली, सदर कारचा व मिळाले बातमीतील कारचा नंबर एकच असल्याने लागलीच आम्ही सदर कारची तपासणी केली असता सदर कारमध्ये विदेशी दारुचे बॉक्स आढळुण आले, त्यांवेळी सदर कारमधील चालक व आत मध्ये बसले इसमास बॉक्स मध्ये काय आहे, असे विचारता त्यांनी विदेशी दारुचे बाटल्या आहेत. त्यावर त्यंाना दारु वाहतुकी / विक्रीचा परवाना आहे काय असे विचारता त्यांनी परवाना नसलयाचे सांगीतले. सदर कारवरील चालकास व आत मध्ये असले इसमास त्यांची नावे गावे विचारता त्यांनी त्यांची नावे 1) उध्दव किसन गायकवाड वय- 37 वर्षे 2) विक्रम भिमराव गायकवाड वय- 25 वर्षे दोन्ही रा चिंचाळे ता. आटपाडी जि. सांगली असे सांगीतले. त्याचे ताब्यात मिळुन आले प्रोव्ही मालाचे वर्णन खालील प्रमाणे.
1) 6,00,000/- रू. एक राखाडी रंगाची इनोव्हा कार तिचा आरटीओ रजि.नं.एम एच 04 कक़1053 अशी असलेली जुवाकिअ.
2) 57600/- त्यामध्ये एकुण 8 बॉक्स प्रत्येक बॉक्स मध्ये 48 विदेशी दारु मॅकडॉल नं.1 असे लेबल असलेल्या 180 मिलीच्या एकूण 384 सिलबंद बाटल्या किं. छापील 150/- रू प्रत्येकी. एकून 6,57,600/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांचे विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(क),(ड), 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.