प्रशासनाचे दुर्लक्ष ,
सय्यद नजाकत ,
बदनापूर/प्रतिनिधी
आरोग्य विभागाच्या द्रुलाक्षामुळे बदनापूर शहरात कोरोना प्रादुभाव वाढण्याची चिन्हे दिसत असून गुरुवार २८ मे रोजी शहरात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर काही भाग प्रतिबंधित करण्यात आला असला तरी सदर रुग्ण ज्या वैधकीय व्यवसायिकांच्या संपर्कात आले अश्या चार वैधकीय व्यवसायिकांनी आपले व्यवसाय सुरु ठेवल्याने शहरातच नव्हे तर तालुक्यात कोरोना प्रादुभाव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे मात्र आरोग्य विभाग याकडे लक्ष देण्यास तय्यार नाही हे विशेष
कोरोना रोगाचा फैलाव होऊ नये म्हणीन तब्बल चार लॉक डाऊन पर्यंत सर्व व्यवसाय बंद करण्यात आले होते,सर्वत्र कोरोना बाधित रुग्ण सापडत असतांना बदनापूर तालुका सुखरूप होता मात्र लॉक डाऊन चार ची मुद्दत संपण्याच्या मार्गावर असतांना २८ मे रोजी बदनापूर शहरता दोन व्यापाऱ्यांना कोरोना लागण झल्याचे निष्पन्न झाले असता तहसीलदार संतोष बनकर ,पोलीस निरीक्षक एम बी खेडकर व नगर पंचायत मुख्य अधिकारी डॉ.पल्लवी अंभोरे,पाणी पुरवठा अबियांत गणेश ठुबे यांनी शहरातील काही बहाग प्रतिबंधित करून त्या भागातील नागरिकांना व व्यवसायिकांना बंदी घालण्यात आली
शहरात सापडलेले दोन्ही रुग्णानावर चार वैधकीय व्यवसायिकांनी उपचार सुरु केलेला होता त्यामुळे हे व्यवसायिक बाधित रुग्णानाच्या संपर्कात आलेले असल्याने त्यांना होम कोरोनटैन करण्याची गरज असतांना देखील सदर व्यवसायिक बिनधास्तपणे आपले व्यवसाय करीत असल्याने शहरासह तालुक्यात कोरोना प्रादुभाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेष म्हणजे आरोग्य विभागाने सदर व्यवसायिकांना नोटीस देऊन त्यांचे दवाखाने सील करणे गरजेचे असतांना देखील आरोग्य विभाग कारवाई करीत नसल्याने जनतेमध्ये शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहे ,सध्या शहरात कोरोना बाधित रुग्नांची संख्या चार झालेली असून एका संशयित रुग्णावर औरंगाबाद येथे उपचार सुरु आहे