Home उत्तर महाराष्ट्र पेडगाव सोसायटीत राज्याभिषेक दिन साजरा….!

पेडगाव सोसायटीत राज्याभिषेक दिन साजरा….!

162

श्रीगोंदा , (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील किल्ले धर्मवीरगडासाठी प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक पेडगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या “राज्याभिषेक दिना” निमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

आज दिनांक ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत शेतकऱ्यांची कामधेनु असलेल्या पेडगाव सोसायटीच्या कार्यालयात ‘शिवप्रतिमेचे” पूजन करत विनम्र मानाचा मुजरा करत, अभिवादन केले, यावेळी चेअरमन श्री. रोहिदास पवार, सचिव श्री. हरिभाऊ झिटे, श्री.लक्ष्मीकांत शिर्के, श्री.विष्णू गावडे, श्री.भारत खेडकर, श्री. सुनील खेडकर, दादासाहेब मांडगे, सागर गोधडे, विनोद गोधडे, आदी उपस्थित होते.