Home सातारा महिला बचत गटांना धमकी देणार्‍या फायनान्स कंपनीवर कारवाई करा…!

महिला बचत गटांना धमकी देणार्‍या फायनान्स कंपनीवर कारवाई करा…!

144

जिल्हाध्यक्ष दादासाहेब अोव्हाळ यांची मुख्य मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

मायणी – सतीश डोंगरे

सातारा – शहरी भागासह गाव वाडयावरील खाजगी फायनान्स कंपन्यांनी महिला बचत गटांमार्फत जाळे विणले आहे.अशा नाना तर्‍हेच्या फायनान्स कंपन्यांनी लोकांना दिखाव्याची मदत केली.आता कोरोना महामारीने जगाला विळखा घातला असताना सरकार अनेक लोकहिताच्या योजना आखत आहे.
त्यात रिजर्व्ह बॅकेने सुद्धा मोठया बँकांना कर्ज वसुली बाबत योग्य निर्देश दिलेले आहेत.
त्यामध्ये सर्वसामान्यापासुन बडया व्यवसायिकांना सवलतीबरोबर सिबील कोरची काळजी घेतली आहे. पण महिला बचत गटांना ज्या फायनान्स कंपन्यानी कर्ज दिले.त्यांनी बचत गटांना टार्गेट करण्यास सुरु केले आहे.अशा सर्व सामान्य लोकांना नडणार्‍या फायनान्स कंपन्यावर खाजगी सावकारी कायद्यअंतर्गत कारवाई करावी.अशी मागणी सातारा जिल्हाध्यक्ष रिपाइं दादासाहेब अोव्हळ,खटाव तालुका अध्यक्ष अनिल उमापे युवा अध्यक्ष विशाल भोसले यांनी मा.मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
तरी महिला बचत गटांना फायनान्सचे लोक भेटून लाँकडाउन काळातील मागील हप्त्यासह दंड व व्याज भरावे लागेल, नाही तर जप्ती असा दम टाकत आहेत. सहा महिने कुणी ही कसले कर्जाचे हप्ते भरू नये व मागू नये, असे आदेश आसताना काही फायनान्स यामध्ये माईक्रो, ग्रामीण इंडिया बुल्स, देना, हिंदुस्थान, कुटा, बधंन, चैतन्य, उज्वल, स्माँलउजीवन, एकविटा, ग्रामन्यूडल, त्रासना, भारत, डि.सी.बी बँक इ.फायनान्स कंपन्यानी मनमानी कारभार करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे. कौटूंबीक कलह बरोबर भितिचे वातावण झाले आहे. तरी मुख्यमंत्री महोदयांनी वैयक्तीक लक्ष घालावे, अन्यथा महिला भगीनीच्या हितासाठी रिपाई (ए) च्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.