वागदरी / नागप्पा आष्टगी
अक्कलकोट – तालुक्यातील वागदरी येथील ग्रामसुरक्षा दलास वंचित बहुजन आघाडीचे आंनद चंदनशिवे यांनी घेतली भेट.!
गेल्या तीन महिन्यापासून वागदरी येथे आंबेडकर चौकात कोरोना च्या पार्श्वभूमीवर निस्वार्थीपणे कुठलेच मोबदला न घेता.वागदरी येथिल कोरोना प्रतिबंधक समिती व ग्राम सुरक्षा दल काम करत आहे.या दलास अक्कलकोट तहसिलदार मँडम,आमदार सचिनदादा कल्याणशेटी भेट घेऊन त्याच्या कामाची कौतुक केले आहे.
सोलापूर येथील कार्यक्षम नगरसेवक म्हणून परिचित असलेले वंचित बहुजन आघाडी नेते नगरसेवक मा.आनंद चंदनशिवे यांनी भेट घेऊन त्याचा कामाचे कौतुक करून त्याचे मनोबल वाढवले व त्याना प्रोत्साहन दिले.
ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा दला मध्ये महिलाचा सहभाग उल्लेखनीय ठरत आहे.गेल्या दोन महिन्यापासून वागदरीत बाबासाहेब आंबेडकर चौकात सक्षमपणे महिला गाव सुरक्षित करण्याची जबाबदारी उत्तमपणे पार पाडत आहेत.कोविड 19 कोरोना प्रतिबंधक ग्राम सुरक्षा दलात विजयकुमार शिंदे,शरणबसप्पा शिंगे,मल्लिनाथ नडगेरी,चिदानंद परिट,लक्ष्मण माताळे,महादेव सोनकवडे,रामराव सकट,राजकुमार यादव,शिवानंद पूरत व महिला सदस्य ललिता भटारे,गंगूबाई कुंबळे,महानंदा वमने,जगदेवी मुरळी यादी उपस्थित होते.तसेच वागदरी ग्रामपंचायत सदस्य सुनिल सांवत,ज्ञानेश्वर नडगेरी व जेष्ठ नागरिक भानुदास लोंखडे उपस्थित होते