Home महत्वाची बातमी मायणी पक्षी अभयारण्यातील बागेसाठी सरसावले मायणीचे दोन युवक बागेचे रुपडे पालटले ,...

मायणी पक्षी अभयारण्यातील बागेसाठी सरसावले मायणीचे दोन युवक बागेचे रुपडे पालटले , अनेक सामाजिक कार्यकर्तेही सामावले

262

मायणी – सतीश डोंगरे

सातारा – मायणी येथील ब्रिटिश कालीन पक्षी आश्रयस्थान हे खूप दिवसापासून दिमाखात मायणीच्या निसर्गसौंदर्यात भर टाकणारे होते. ब्रिटिश कालीन तलावांमध्ये बाहेरून येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण जास्त आहे .

या अभयारण्यांमध्ये पर्यटकांसाठी वनविभागाने पर्यटकांसाठी व लहान मुलांसाठी खेळणी बगीचा तयार केलेला होता पर्यटक व मायणी येथील नागरिक सकाळी व्यायामासाठी तसेच फिरण्यासाठी या बागेमध्ये येऊन बसत फेरफटका मारत परंतु बरेच दिवस झाले या बगीचा कडे वनविभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे बागेची दुरावस्था झाली होती हीच बाग शेवटची घटका मोजत असल्याचे चित्र होते याकडे वन विभागाचे दुर्लक्ष झालेले कटाक्षाने जाणवते परंतु हीच मायणी ची अस्मिता असणारे पक्षी अभयारण्यातील बागेची झालेली अवस्था पाहून त्या बागेच्या पुनरुज्जीवनासाठी मायनी तील पत्रकार दत्ता (सुमित) कोळी व सागर घाडगे हे दोन्ही युवक सरसावले आहेत. एकमेकांच्या समन्वयाने वनविभागस रीतसर अर्ज करून परवानगी घेऊन स्वतः श्रमदान करून गेली पंधरा दिवस श्रमदान करून बागेची कायापालट केला.
सदैव सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न करणारे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कोळी यांच्या मनामध्ये हा विचार आल्यानंतर त्यांच्या सागर घाडगे याना सोबत घेत त्यांनी कामाचा निश्चय करून आपल्या मायणी चा नावलौकिक वाढवणाऱ्या पक्षी आश्रयस्थानाची अस्मिता जपली पाहिजे या उद्देशाने दोघांनीच मिळून बागेमध्ये असणारा कचरा, दारूच्या बाटल्यांचा खच, अस्ताव्यस्त उगवलेली झाडे,दोन फुटापर्यंत वाढलेले गवत आशा प्रकारे सगळ्या बागेची झालेली दुरावस्था त्यांनी गेली तब्बल १५ दिवस श्रमदान करून या भागाचा कायापालट केलेला दिसून येत आहे.
फक्त संकल्पच नाही तर प्रत्येक्ष कार्य करून सकाळ ,संध्याकाळ श्रमदानाच्या माध्यमातून पूर्वीच्या बागेच्या रूपरेषा आज उघडीस आणली आहे. यामुळे पूर्वीची बाग आणि आत्ताची बाग यामध्ये खूप बदल दिसून येत आहे. या कामाबद्दल दत्ता कोळी व सागर घाडगे यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच समाधानाची चमक दिसून येत आहे.
गेल्या ३० मे पासून सुरू केलेल्या कामात आठ दिवसानंतर मायणीत राज बहुउद्देशी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम कचरे ,मायणी पत्रकार संघाचे मा.कार्याध्यक्ष पोपट मिंड,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारसंघाचे खटाव माण तालुक्याचे संघटक मारुती पवार, तालुकाध्यक्ष सतीश डोंगरे, विनायक ग्रुप चे सचिन घाडगे,सोमनाथ चव्हाण,शिक्षक साळुंखे सर,सह्याद्री ट्रेकर्स चे विजय वरुडे,शिवाजी कणसे,जगदंब ग्रुप चे श्रीकांत सुरमुख,विपीन पुस्तके,उमेश यादव,गणेश थोरात व इतर सदस्य यांनी सहभाग घेत या भागाची साफसफाई करण्यात महत्वाचा उचलला.
या उपक्रमाची दखल घेत चालू वर्षीच्या रोपवाटिका पूर्ण करून वनपाल काश्मीर शिंदे,वनरक्षक संजीवनी खाडे यांनी रोपवाटिकेत काम करणाऱ्या पुरुष व महिला मजुरांना बागेच्या दुसऱ्या टप्प्यातील स्वच्छतेसाठी पाठवून या युवकांच्या कामास हातभार लावला.
सध्या या ठिकाणच्या परिसराचे स्वच्छेतेचे काम जरी पूर्ण झाले असले तरीही याठिकाणी फुलांच्या फळांच्या झाडांची लागवड,रंगरंगोटी, वनविभाग प्रतिबंधक सुचनांचे फलक करणे आवश्यक असून मायणीतील विविध मंडळे ,संस्था यांनी यामध्ये सहभाग घेऊन मायणीचे निसर्गवैभव असलेल्या भागाला जोपान्याच्या कार्यात ग्रामस्थांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन या युवकांकडून व वनविभागमार्फत करण्यात आले आहे.

मायणी ब्रिटिशकालीन पक्षी आश्रयस्थान ही मायणीची अस्मिता असून याठिकानी आलेल्या पर्यटकांनी या बागेची झालेल्या दुरवस्था प्रश्नी नाराजगी दाखवली होती याचे आम्हाला दुःख झाले होते म्हणून आमचे पत्रकार मित्र दत्ता कोळी यांचे समवेत खोरे हाती घेण्याचा निर्णय घेतला. स्वच्छ झालेल्या या कामाचे मनस्वी आनंद होत असून ही वनराई जपण्यासाठी समस्त मायणीकरांनी पुढं यावं हा प्रथम आमच्या कार्याचा प्रथम टप्पा असून भाग ज्यावेळी प्रत्येक्ष फुलेल ,बहरेल त्यावेळी आमचे कार्य सफल होईल असे मला वाटले.
सागर घाडगे ,निसर्गप्रेमी,मायणी
[ पक्षी आश्रयस्थानातचालू असणारे काम कौतुकास्पद असून राज बहुद्देशीय सामाजिक संस्थाही या कामात मदत करीत असून मायणी गावातील युवकानी ही या कार्यात सहभागी झाले पाहिजे, तसेच गावातील लोकांनी घरातील फळबिया,फुलांच्या झाडांच्या काड्याही रोपंन करण्यासाठी द्याव्यात. याच्या रोपणातून बहरलेल्या बगिच्यात यामुळे निश्चित याठिकाणी पर्यटकांची संख्या वाढेल- राजाराम कचरे-अध्यक्ष,राज बहुउद्देशीय सामाजिक संस्था.मायणी.