Home विदर्भ कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त विचारमंचच्या वतीने विविध उपक्रम संपन्न….!

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त विचारमंचच्या वतीने विविध उपक्रम संपन्न….!

306

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ – काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ शहरात राहुल गांधी विचारमंचच्या वतीने जिल्हाध्यक्ष जावेद परवेज अन्सारी यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक हिताचे उपक्रम राबवून सामाजिक सेवाभाव सप्ताह साजरा करण्यात आला. यात कोरोना योद्धांचा सत्कार,रोग प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आर्सेनिक अलबम 30 टेबलेट वितरण , गरजवंताना मोफत शिवभोजन वाटप हे उपक्रम राबविण्यात आले.

शहरात कोरोना महामारी दरम्यान यवतमाळ शहरात उदभवलेल्या परिस्थितीत सामाजिक दायित्व व कर्तव्य म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रभाविताना मदत केली त्या कोरोना योद्धांचा राहुल गांधी विचारमंचच्या वतीने कोरोना वारीयर्स म्हणून मंचचे जिल्हाध्यक्ष जावेद अन्सारी व विविध मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून सम्मानीत करण्यात आले.कोरोना दरम्यान जीवाची पर्वा न करता सेवा देणारे शहरातील सामाजिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवर,सेवाभावी सामाजिक संघटन,जिल्हा व पोलीस प्रशासनातील अधिकारी , कर्मचारी , विविध प्रसार माध्यमातील पत्रकार बांधव, आरोग्य विभाग , नगरपरिषदेतील अधिकारी , सफाई कर्मचारी , आशा आरोग्य सेविका सामाजिक कार्यकर्त्यांचे कार्य पाहता येणाऱ्या पिढीला त्यांच्या पासून प्रेरणा मिळावी या उद्देशाने या कोरोना योद्धांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.या सप्ताह दरम्यान नगरसेवक जावेद अन्सारी यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 10 मध्ये येत असलेल्या इंदिरा नगर, हिन्दू समशानभूमि परिसर , पासीपुरा , भोसा नाका,तारपुरा परिसरात राहणाऱ्या नागरिकांची रोग प्रतिकारशक्ति वाढावी याकरीता उपयुक्त असलेल्या आर्सेनिक अल्बम 30 या होमियोपैथी औषधीचे वाटप करण्यात आले.
आज 19 जून रोजी खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राहुल गांधी विचारमंच जिल्हाध्यक्ष जावेद अन्सारी यांच्या वतीने यवतमाळ शहरातील सर्व शिवभोजन सेंटर वर गोर गरीब व गरजूना निशुल्क भोजन वाटप करण्यात आले.
या एकदिवसीय उपक्रमाचे सर्व खर्च जावेद अन्सारी यांच्या वतीने वहन करण्यात आले.या सर्व उपक्रमासाठी नगरसेवक जावेद अन्सारी,वसीम मवाल, तौरेत खान,नईम पहेलवान, अहमद शाह आदींनी परिश्रम घेतले.