Home विदर्भ राहुल प्रियांका गांधी सेनेकडून मा. राहुल गांधींच्या वाढदिवशी ५० गरजुना किराणा किट...

राहुल प्रियांका गांधी सेनेकडून मा. राहुल गांधींच्या वाढदिवशी ५० गरजुना किराणा किट चे वाटप – अभिजित फाळकेचा पुढाकार

154

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – सध्या कोरोनामुळे असलेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या वर्षी कुठल्याही प्रकारचा व्यर्थ खर्च व जाहिरातबाजी न करता ‘गरजूंना मदत’ या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करण्यात आला.

टाळेबंदीमुळे संपूर्ण नाभिक समाज त्यांचा मूळ व्यवसाय केशकर्तनालय बंद असल्यामुळे अत्यंत हलाखीची परिस्थिती जगत आहे. अशा वेळेस राहुल प्रियंका गांधी सेना प्रदेशाध्यक्ष अभिजित फाळके पाटील यांच्या मार्गदर्शनात जीवनावश्यक वस्तूंच्या 50 किटा वर्धा शहरातील विविध भागात वाटप करण्यात आला.
खऱ्या गरजूंचा शोध घेऊन किट वाटपाचे कार्य राहुल प्रियांका गांधी सेना शहराध्यक्ष पंकज इंगोले, सागर सबाने, प्रतिभाताई ठाकूर, कुणाल भगत, राजू देवढे, रवींद्र वाघमारे, देवा वानखेडे, प्रफुल्ल पिस्तुलकर, आशिष इतवारे, अक्षय महाकाळकर, आशिष तायडे, चैतन्य गावंडे आदींनी केले.