वागदरी / नागप्पा आष्टगी
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील ग्राम सुरक्षा समितीचे सर्व कार्यकर्ते उत्तम सेवा बजावल्यामुळे श्रीमती सुलोचना धरणे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आले.
कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव झाल्या पासुन म्हणजे २३ मार्च पासुन वागदरी येथील स्त्री शक्ती महिला मंडळ यांच्याकडून ग्राम सुरक्षा दल स्थापन करून गावात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणुन जन जागृती करण्याचे काम प्रामाणिक पणे करीत आहेत. शासनाकडूुन किंवा ग्रामपंचायत कडून कशाचीही अपेक्षा न करता १५ महिला काम करीत आहेत. या कार्याची दखल गावातीलच एक सर्व सामन्य महिला श्रीमती सुलोचना धरणे यांनी घेतले. सर्वाचे सत्कार करून कामाचे प्रसंशा करण्यात आला .
या सरपंच ललिताबाई ढोपरे, स्त्री शक्ती महिला मंडळ अध्यक्षा विमलाबाई पोमाजी, माजी तंटामुक्त अध्यक्षा लक्ष्मीबाई पोमाजी, सुलोचना नंदर्गी, नागिणी शिंदे, शौलजा वाडी, शाणव्वा भस्मे, आदी महिला उपस्थित होते. या अगोदर देखील सुलोचना धरणे यांनी सामाजिक बांधिलकी जपत अंगणवाडी शाळेस लाईट फिंटीग व फंखा दिले होते.