६४४ सफाई कामगार व कुटुंबाची वैद्यकीय तपासणी तर ३९१० कुटुंब याचे सर्वेक्षण
रावेर (शरीफ शेख)
इस्लाम धर्मात मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे नमूद असून त्या आधारित जळगाव केअर युनिट तर्फे आज जळगाव शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयात कार्यरत असलेले सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबियांची वैद्यकीय तपासणी व सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले होते व याचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी डॉक्टरांना आशीर्वाद दिले ते आशीर्वाद म्हणजे त्यांच्या परलोकाची किल्ली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही असे मत मुफ्ती अतिकउर रहेमान यांनी शिबिर समारोप प्रसंगी केले.
अध्यक्षस्थानी गफ्फार मलिक तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर मंधान पंडित,नगर सेवक चेतन संकत आदी उपस्थित होते.
जळगाव केअर युनिट चे कार्य म्हणजे शासन व जनता यामधील कर्तव्य करणारी फळी- आयुक्त सतीश कुलकर्णी
वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन मनपा जळगाव शहराचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी फीत कापून केले त्या वेळी महापौर भारतीताई सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक चेतन संकत, गफ्फार मलिक , नगरसेवक रियाज बागवान,हाजी युसूफ , अक्रम देशमुख ,फारुक शेख, मोहन करोसिया ,घनश्याम चावरिया, प्रकाश संकत, संजय संकेत दिलीप चांगरे,श्याम पवार, कैलास जाधव, दिगंबर घेगट, रमेश चवण, मुकेश गुप्ता, प्रेम पवार ,राजू हंसकर,सदू करोशिया आदी उपस्थित होते.
महापौर यांनी दिल्या शुभेच्छा
जळगाव कोविड केअर युनिट हे शहरात सर्व मोहल्यात व वार्डात सर्वेक्षण व वैद्यकीय शिबिर घेत आहे हे अत्यंत अभिनदनिय बाब असून ज्या वेळी मनपा काही तांत्रिक अडचणीमुळे कॅम्प घेऊ शकत नाही त्यादरम्यान हे युनिट कॅम्प घेत आहे म्हणून आम्ही मनपा त्यांच्या सोबत असून त्यांच्या कार्यास शुभेच्छा देतो असे उद्दगार महापौर भारती ताई सोनवणे यांनी काढले.
जनरल प्रॅक्टिशनर हे खरोखरच अभिनंदनास पात्र आहे -डॉक्टर मंदार पंडित* समारोपीय भाषणात डॉक्टर मंदार पंडित यांनी जळगाव शहरातील बी यु एम एस व बी ए एम एस या अल्पसंख्यांक डॉक्टरांनी जे कार्य करीत आहे त्या कार्याला माझा सलाम असे म्हणून त्यांनी डॉक्टरांच्या पाठीवर आशीर्वादाची थाप दिली.
उद्घाटन व समारोप कार्यक्रमास उपस्थित मान्यवर
जळगाव कोविड केअर कॅम्प च्या उद्घाटन व समारोप कार्यक्रमात मुफ्ती अतिकुर रहमान, डॉक्टर जावेद शेख, फारुक शेख, अजीज शिकलकर,अन्वर सिकलगर, रहीम तडवी, जन नायक फाऊंडेशनचे फिरोज पिंजारी व फरीद खान,अलहिंद चे अल्ताफ शेख,अलखैर चे युसूफ शाह, काद्रिया फाऊंडेशनचे फारुख कादरी ,इदगाह ट्रस्टचे अनिस शाह व मझर खान यांची उपस्थिती होती.
मुस्लिम डाक्टर व सामाजिक सनघटनेने आमच्या कडे लक्ष दिले-भाजप नगर सेवक चेतन संकत
सफाई कामगार हा रोज सकाळी आपली सेवा सगळी दूर करतो,परंतु कोणीही त्याची काळजी घेत नाही आज स्वतःहून जळगाव कोविड केअर युनिट चे गफ्फार मलिक व फारूक शेख यांनी नुसती काळजी न घेता आपले २३ योध्दा मुस्लिम डॉक्टर घेऊन आमच्या वस्तीत आले व प्रेमाने तपासून औशोधपचार दिला ते ही भाजप नगर सेवकांच्या वार्डात हे जळगांव मधेच घडू शकते व हाच जळगाव पॅटर्न म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर भारतात जाऊ शकेल. माझा संपूर्ण समाज यांच्या ऋणात राहू इच्छितो असे म्हणताच संपूर्ण समाजाने टाळ्या वाजवून त्याला संमती दिली.
सफाई कर्मचाऱ्यांसाठी २३ कोरोना योद्धा डॉक्टरांनी दिली सेवा
डॉक्टर वसीम अहमद, डॉक्टर जाकिर पठाण ,डॉक्टर जावेद शेख ,डॉक्टर अझीझुललाशेख, डॉक्टर असीम खान ,डॉक्टर रिजवान खाटीक, डॉक्टर तौसिफ शेख, डॉक्टर फिरोज शेख ,डॉ कामिल शेख,डॉक्टर शाहरुख शेख, डॉक्टर अमजद खान ,डॉक्टर अब्दुल वहाब, डॉक्टर इम्रान खाटीक ,डॉक्टर वकार शेख, डॉक्टर वसीम कुरेशी, डॉक्टर नदीम रहमानी, डॉक्टर नसीम अन्सारी, डॉक्टर मोहसिन कुरेशी, डॉक्टर वसीम शाह, डॉक्टर एजाज शाह ,डॉक्टर नदीम नजर, डॉक्टर निषात अब्दुल वहाब, डॉक्टर आफ्रीन
मुख्तार शेख ,डॉक्टर मंदार पंडित या योद्ध्यांनी सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना औषधोपचार दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फारूक शेख यांनी सादर केले,मुफ्ती अतिक यांनी आढावा सादर केला तर गफ्फार मलिक यांनी १३ दिवसाची कामगिरी सादर केली डॉ जावेद शेख यांनी आभार मानले.