Home जळगाव औरंगाबाद येथील पत्रकारांवरील गुन्हे मागे घ्या – फैजपुर पत्रकारांची मागणी

औरंगाबाद येथील पत्रकारांवरील गुन्हे मागे घ्या – फैजपुर पत्रकारांची मागणी

148

रावेर (शरीफ शेख)

औरंगाबाद येथील दैनिक दिव्य मराठीचे संपादक, प्रकाशक व वार्ताहर यांच्यावर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे, याबाबत सविस्तर माहिती औरंगाबाद येथे कोरोना विषाणू संसर्गाचा एकप्रकारे कहर झाला आहे. यामुळे औरंगाबाद येथील स्थानिक प्रशासनाची असलेली भूमिका, जबाबदारी व निष्क्रिय कार्यक्षमता या बद्दल वास्तविकता दर्शवणारे वृत्त दि. २७ जून २०२० रोजी ‘दैनिक दिव्य मराठी’ मधून प्रसिध्द करण्यात आले. तेथील अशा गंभीर परिस्थितीचा आढावा जनतेसमोर मांडल्यामुळे तेथील स्थानिक प्रशासनाचे बिंग बाहेर आले. त्याचा मनात राग धरून स्थानिक प्रशासनाने ‘दै. दिव्य मराठी’ चे संपादक प्रकाशक व वार्ताहर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले, सत्य परिस्थिती जनते समोर मांडण्याचे काम पत्रकार आपल्या लेखणीतून करत असतात मात्र वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून पत्रकारांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करणे म्हणजे एक प्रकारची दडपशाही करून लोकशाहीचा गळा घोटल्यासारखे आहे. या करिता फैजपूर येथे पत्रकार बांधवांच्या वतीने या कृत्याचा जाहीर निषेध करत दैनिक दिव्य मराठीचे संपादक, प्रकाशक व वार्ताहर यांच्या विरोधात दाखल केलेले गुन्हे त्वरीत मागे घेण्यात यावे या आशयाचे निवेदन आज दि. ३० जून २० रोजी प्रांतधिकारी फैजपूर डॉ. अजित थोरबोले यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब व मा. जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.

यावेळी आप्पासाहेब उदय चौधरी, अरुण होले, वासुदेव सरोदे, उमाकांत पाटील सर, ललित फिरके सर, नंदकिशोर अग्रवाल, समीर तडवी, शाम पाटील, बंटी आंबेकर, संजय सराफ, योगेश सोनवणे, सलीम पिंजारी, राजू तडवी, राजेंद्र तायडे, मयूर मेढे, शाकीर मलिक, जावेद काझी, शेख कामिल, इदू पिंजारी, मुद्दसर नझर, मुबारक तडवी, देवेंद्र झोपे. असे फैजपूर शहरातील व परिसरातील पत्रकार उपस्थित होते.