प्रत्येक खेळाडूने खेळताना खिलाडू वृत्ती जोपासावी – सौं. अंजली ठाकरे
पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
अमरावती , दि. ०३ :- विदयार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनामध्ये खेळत असताना नेहमी खिलाडूवृत्ती जोपासावी, खेळामुळे शारीरिक क्षमता तयार होऊन ताण तणावाचे वातावरण निवळल्या जाते. असे क्रीडापटू व शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ अंजली ठाकरे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणातून व्यक्त केले.
क्रीडा स्पर्धेच्या उदघाट्न प्रसंगी सौ अंजली ठाकरे, अस्पा बंड सन्स चे संचालक रंजीत बंड., जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के. एस .विसाळे, सहाय्यक संचालक नरेंद्र येते, संस्थेचे प्राचार्य सौ. एम डी देशमुख, निरीक्षक श्री गोरे, रेड्डीवार, एस. एल. वानखडे, सौं बिडकर मॅडम उपप्राचार्य चुलेट, भोजराज काळे सर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या प्राचार्या सौं एम. डी. देशमुख यांनी क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबत ची माहीती विशद केली.
स्पर्धेच्या समारंभात उपस्थित मान्यवरांनी यावेळी आपली मते मांडली. उद्योजक रणजित बंड यांनी विद्यार्थ्यांनी स्पोर्टींग स्पिरिट जोपासायला पाहिजे. प्रत्येक खेळ हा जिकंण्याच्या निर्धाराने खेळायला हवा. असे आवाहन उपस्थित खेळाडूंना व शेकडो विद्यार्थ्यांना यावेळी त्यांनी केले.
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. के एस विसाळे यांनी आपल्या भाषणातून आय टी आय अमरावती च्या प्राचार्य तसेच निदेशक वर्ग व कर्मचारी वर्ग यांनी निर्धारित वेळेत जिल्हा स्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी यथोचित नियोजन करून यशस्वी आयोजन करून दाखविले त्याबद्दल अमरावती आय टी आय कौतुकास पात्र आहेत असे मत यावेळी व्यक्त केले.
क्रीडा स्पर्धेतील कबड्डी चा उदघाटणीय सामना नांदगाव खं. Iti व मोर्शी iti यांच्या दरम्यान झाला. यावेळी जिल्हा माहीती अधिकारी हर्षवर्धन पवार यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये खेळाडूंचा परिचय करून दिला. या प्रथम दर्शनी सामन्यात मोर्शीचा संघ विजयी झाला. तर व्हॉलीबॉल या खेळाचा सामना मोझरी व चा.रे. यांच्या दरम्यान होऊन मोझरीचा संघ विजयी झाला.
यावेळी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी, क्रिकेट, खोखो, व्हॉलीबॉल, वयक्तिक अॅथलेटिक्स इत्यादी प्रकारच्या खेळांचा अंतर्भाव करण्यात आला.
क्रीडा स्पर्धा समारंभाला यावेळी निरीक्षक सर्वश्री अनिल रेड्डीवार, एस. एस. गोरे, एस. एल वानखडे, प्राचार्य एस एस पाटबागे, ए. एम मेश्राम, पी जी कुमरे, वाय. बी देशपांडे, जी पी मसराम, वि आर पडोळे, एन आर कथाले, के डी फुटाणे, आर जे नेमाडे, जे आर झेगेकर, जी वि चोपडे, श्रीमती एम आर गुढे, डी. एच. गुरव आदी उपस्थित होते.
या क्रीडा स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यासाठी गटनिदेशक के एस वानखडे, डी डी अढाऊ, आर एल राणे, एन एस मोरे, पी डी महल्ले, पी आर राऊत, एस एम मक्रमपुरे, आर बी धोटे, आर एस दांडगे, आर ए सदार, जी. एन झोपाटे, एस जे पाटील, एन, ए रोंडाळकर, एन. एस ईसलं, सौं पाटबागे, एस एम ढेपे, आर एस किनगे, आर जि. बंड, एस. डी. आवारे. बाम्बडकर, आदी निदेशक व इतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुरेख संचालन सौं सुमेधा मोरे यांनी तर आभारप्रदर्शन प्राचार्य कुमरे यांनी केले. या क्रीडास्पर्धेसाठी जिल्हाभरातून शेकडो खेळाडू व विद्यार्थी हजर होते.