Home परभणी पीक विमा भरण्यासाठी सातबाराचे लच्चाड बंद

पीक विमा भरण्यासाठी सातबाराचे लच्चाड बंद

331

सखाराम बोबडे यांच्या मागणीला यश

गंगाखेड / परभणी – पिक विमा भरण्यासाठी तलाठ्याच्या सही शिक्का सह साक्षांकीत केलेल्या सातबारा ची अट शासनाने यावर्षी रद्द केली. मागील एक वर्षापासून धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक, परभणी लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी पीक विम्यासाठी सातबाराचे लच्चाड बंद करण्याची मागणी लावून धरली होती.शेवटी तिला या वर्षी यश आले.मागील वर्षी पीक विमा भरण्याच्या काळात तत्कालीन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे सखाराम बोबडे पडेगावकर यांनी पीक विम्यासाठी सातबारा चे लच्चाड बंद करण्याची मागणी केली होती. शासनाकडे त्यांच्या पोर्टलवर सातबारा होल्डिंग असताना त्याच सातबारा कागदावर काढून परत त्यावर तलाठ्याकडून सही शिक्का घेऊन ग्राहक सेवा केंद्रावर जमा करण्याची गरजच काय? असा सवाल त्यांनी निवेदनाद्वारे शासनाला विचारला होता. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही लेखी निवेदनाद्वारे सातबाराचे लच्चाड बंद करण्याची मागणी केली होती.एक वर्षांपूर्वी केलेली मागणी सध्याच्या सरकारने पूर्ण केली असून यावर्षी सातबारा व होल्डिंग वर तलाठ्यांच्या सही व शिक्क्याची गरज असणार नाही. शेतकरया कडे असलेल्या जुन्या सातबारा अथवा ऑनलाईन केंद्रातून घेतलेल्या सातबारा पिक विमा भरण्यासाठी चालणार आहेत. एकूणच सातबारा होल्डिंग वरील सही शिक्क्याची सक्ती हटविल्यामुळे कोरोना च्या काळात शेतकर्‍यांचे हाल काही प्रमाणात का होईना कमी होण्यास मदत झाली आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी सध्याचे सरकार व निवेदन कर्ते,परभणी लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांचे अभिनंदन केले आहे.