Home मराठवाडा माहूर- इन्कलाब जिंदाबाद च्या नाऱ्याने शहर दुमदुमले…!

माहूर- इन्कलाब जिंदाबाद च्या नाऱ्याने शहर दुमदुमले…!

169

मजहर शेख

‘सीएए’ ‘एनआरसी’ ‘एनपीआर’ विरोधात जनआक्रोश…!!

नांदेड / माहूर , दि. ०३ :- सीएए, एनआरसी, एनपीआर’ च्या विरोधात संविधान बचाव समिती तर्फे आज दिनाक २ गुरवार रोजी माहूर शहरात टी पॉईंट तहसिल कचेरी पर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे रूपांतर सभेत होऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात झालेल्या ऐतिहासिक व भव्य सभेत उपस्थित मान्यवरांनी या कायद्याचा विरोध दर्शवित धर्माच्या नावाखाली देशाचे विभाजन करू पाहणाऱ्यांच्या विरोधात आपली भूमिका मांडली. यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

सीएए, एनआरसी, एनपीआर’ च्या विरोधात संविधान बचाव समिती तर्फे काढण्यात आलेल्या भव्य मोर्चाची सुरुवात टी पॉइंट येथील मदिना मस्जिद स जोडून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने झाली. मोर्चेकऱ्यांनी धरती बाटी सागर बाटा मत बाटो इंसान को.. हमे चाहिये आजादी.. इंकलाब जिंदाबाद असे नारे देऊन माहूर शहरं दुम दुमून सोडले. सदर मोर्चा हा तहसील मार्गावर पोहोचल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत होऊन कृषी उत्पन्न बाजार समिती पटांगणात झालेल्या भव्य सभेत नश्रूल्ला खान रहमानी,जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष समाधान जाधव,एम.आय. एम.चे जिल्हाध्यक्ष अहमद मिर्झा बेग,वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते डॉ.संतोष वाठोरे,भीम टायगर सेने चे राहुल भगत,वैजनाथ करपुडे पाटील,माजी नगराध्यक्ष प्रा.राजेंद्र केशवे,राजू शेळके,बाबू फारुकी,शाहीर संदीप राजा, कॉ.अर्जुन आडे,बाबा डाखोरे,मनोज कीर्तने,यांनी सीएए, एनआरसी, एनपीआर’ लागू करू पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणाचा खरपूस समाचार घेतला.संविधान बचाव समितीचे अध्यक्ष आरेफ बावानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला जीप सदस्य मधुकर राठोड,बंडू नाईक, माजी जीप उपाध्यक्ष प्रकाश राठोड,आनंद पाटील तुपडाळे,सभापती दत्तराव मोहिते, किशन राठोड,साजिद खान, प्रल्हाद चव्हाण, किशोर पवार, प्रकाश गायकवाड, गोविंद मगरे, सिद्धार्थ तामगाडगे, डॉ, संतोष दांडेगावकर, विनोद राठोड, मेघराज जाधव, जितेंद्र कांबळे, अविनाश टनमने, अजयकुमार कंधारे,अमोल आडे, डॉ.निरंजन केशवे,उपसरपंच संदीप सिड्डेवार,यांची मंचावर उपस्थिती होती.सभेच्या ठिकाणी येऊन तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विलास जाधव,यांनी धर्मनिरपेक्ष राष्ट्र असलेल्या भारतातील नागरिकांना धर्माच्या आधारावर वाटनारे ठरू पहात असलेले व भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 व 15 चे उल्लंघन करनाऱ्या सदर विधेयकामुळे देशातील नागरिकांमध्ये हे निर्माण होत असून ते तातडीने रद्द करण्यात यावे अशी मागणी असलेले राष्ट्रपतींना पाठविले निवेदन व विविध संघटनांनी समर्थनार्थ दिलेली निवेदने स्वीकारली.दरम्यान, मोर्चाच्या मार्गावरील प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. मोर्चेकऱ्यांनी ‘ तानाशाही नही चलेंगी’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘आवाज दो हम एक है’, ‘संविधान के सन्मान में – हम मैदान में’हमे चाहिए आझादि अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मोफिक यांनी तर आभार फिरोज दोसानी,सुरेख सूत्रसंचालन साजिद खान यांनी केले.या वेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक दतराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी विलास जाधव, पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख, सहाय्यक पोलीस अण्णासाहेब पवार,शरद घोडके, मांडवी चे ठाणेदार केंद्रे यांच्यासह 80 पोलीस कर्मचारी 10 होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त लावला होता.मोर्चे करांच्या वतीने बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. सदर मोर्चाचे व सभेचे राष्ट्रगीताने समापन करण्यात आले.