Home जळगाव उपोषणाच्या बाराव्या दिवशी पकोडे तलो और पकोडे बेचो ही संकल्पना राबवून जळगावकरांचे...

उपोषणाच्या बाराव्या दिवशी पकोडे तलो और पकोडे बेचो ही संकल्पना राबवून जळगावकरांचे लक्ष वेधले

218

पकोडे विकून आलेली रक्कम पंतप्रधान निधीत जमा करणार

शरीफ शेख

रावेर , दि. ०४ :- जळगाव मुस्लिम मंच तर्फे जिल्हा अधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा शुक्रवारी बारावा दिवस होता या बाराव्या दिवशी नशिराबाद मुस्लिम हिंदू एकता समितीने सक्रिय सहभाग नोंदवून आपला भारतीय नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवून उपोषण केले.


उपोषणाची सुरुवात अतिक अहमद यांच्या पवित्र कुराण पठाणाने करण्यात आली. नशिराबाद हिंदू मुस्लिम एकता समितीचे नेतृत्व बरकत अली सय्यद व पंकज महाजन यांनी केले . अल्पसंख्याक समाजाच्या मुलांचे पकोडे तलो आंदोलन हाताला काम द्या, देशाचे लक्ष विचलित करू नका, आपण केलेल्या घोषणा पूर्ण करा,दोन कोटी रोजगार द्या देशाच्या तरूणाई चे लक्ष भटकवण्या करीता NRC-CAA असे मुद्दे उकरून काढत देशा मधे
अवस्थता पसरवली जात असल्याने उपोषणार्थी ने मा पंत प्रधान लक्ष चे वेधण्याकरीता पकोडे तळू या.. व विकुया ही संकल्पना फारूक शेख यांनी विषद केली.
बी ए,एम ए,बी ई, बी एड,डी एड,एम बी ए,या सुशिक्षित बेरोजगार तरुणानी पकोड़े तयार करून वीकली असता त्यातून ३५० रुपये प्राप्त झाले.
यांनी केले मार्ग दर्शन
फारूक कादरी ,सै नवाब अली,पंकज महाजन, रंधे विनोद जमील देशपांडे गनी मेमन विश्वास प्रतिभा शिंदे विनोद देशमुख करीम सालार अमानुल्ला शाह ऑफिस शहीद कौशिक पटेल आसिफ शेख गफ्फार मलिक व फारुक शेख यांनी मार्गदर्शन केले
*जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन*
हिंदू मुस्लिम एकता समिती नशिराबाद व मुस्लिम मंच जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सूर्यवंशी यांना पंकज महाजन व बरकत अली यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले त्यावेळी रउफ़ शेख, शेख सांडू, शेख सत्तार ,नईमुद्दीन कमृद्दिन शेख, साबीर कलीम शहा व उमर अली यांची उपस्थिती होती

यांची प्रमुख उपस्थिती
सय्यद नवाब अली, सय्यद बरकत अली, पंकज महाजन , शेख सत्तार, शेख नजीर, दिलीप गवळी, सय्यद निसार, कलीम मन्यार, आसिफ मुत्तलिब, मुगनी मनियार,इस्माईल मन्यार, सय्यद सरताज सय्यद आरिफ अजमल च्या साबिर यासीन कलीम शहा सय्यद वासी जमी लॉजिंग शेख गनी मेमन जमील देशपांडे मुकुंद सपकाळे अंवर सिकंदर सय्यद शाहिद अजित खान शिकलकर डॉक्टर इक्बाल सय्यद नूर कादर गुलाम गाव भावेश आली उमराली अनिशा शेख अनिस रमजान शेख इक्बाल शेकली आदीची उपस्थिती होती.

पाकिस्तान विरोधात मोर्चे नव्हे तर त्यांच्याविरोधात युद्धाला तयार – करीम सालार पाकिस्तान हा आमचा परंपरागत शत्रू देश असून आम्हीच त्यांच्याकडे कधीही वाढदिवसाचा केक खायला गेलेलो नाही परंतु वेळ प्रसंगी भारत देशासाठी पाकिस्तानशी लढण्याची भारतातल्या मुस्लिमांची तयारी असून आपण आजच आदेश दिल्यास आम्ही त्या देशा विरुद्ध युद्ध करण्यास तयार असल्याचे आपणास दिसून येईल असे मत मौलाना आझाद विचार मंचचे जळगाव चे अध्यक्ष करीम सालार यांनी व्यक्त केले.