Home मराठवाडा नवीन वर्षाची सुरुवात दारू पिऊन नव्हे, दूध पिऊन करा सामाजिक विचार मंच...

नवीन वर्षाची सुरुवात दारू पिऊन नव्हे, दूध पिऊन करा सामाजिक विचार मंच ने व्यसनमुक्तीचा संदेश दिला

200

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

औरंगाबाद , दि. 04 :- 31/12/ 2019 मंगळवार रोजी सायंकाळी 5.00 वाजता सामाजिक विचार मंच बजाजनगर ने उपक्रमाला सुरुवात केली उपक्रमाची सुरुवात प्रत्येक नागरिकाला एक कप दूध देऊन केली भारतामध्ये युवकांचा देश म्हणून ओळखला जातो बरीच तरुण मंडळी व्यसनाधीन ते कडे वळलेली आहे याला वेळीच आवर घालायला हवा हा एक छोटासा प्रयत्न सामाजिक विचार मंचने या उपक्रमाच्या माध्यमातून केलेला आहे हा उपक्रम हायटेक इंजिनिअरिंग कॉलेज जवळ घेण्यात आला लोकांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या उपक्रमाला लाभला एक कप दूध वाटप होत असताना व्यसनमुक्ती वरील गाणे तसेच श्री प्रदीप माळी व लता माळी व्यसनमुक्ती प्रचारक यांनी उपस्थितांना व्यसनांचे होणारे वाईट परिणाम त्यामुळे उद्ध्वस्त होणारे कुटुंब या पासून होणारी तरुणांची हानी या विषयी मार्गदर्शन केले साधारण एकूण 300 लोकांना दूध वाटप करण्यात आले.

हा उपक्रम यशस्वी करण्याकरता नवनाथ राजे , सागर पट्टेवार देवानंद पाईकराव, संजय काळे ,रवींद्र शेलगावकर, सौ मनीषा शेटे, सौ लता माळी, चिंतामणी शेटे, सामाजिक विचार मंचचे अध्यक्ष विकास पाटील ,उपाध्यक्ष किशोर सेलकर ,व सौ संगीता आवटे, अतुल बोपे वार, सावता अवघडे इत्यादींनी परिश्रम घेतले