Home महत्वाची बातमी नव निर्वाचित राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला पदाचा राजीनामा….!!

नव निर्वाचित राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला पदाचा राजीनामा….!!

147

अमीन शाह

नुकतेच शिवसेनेकडून राज्यमंत्री झालेले अब्दुल सत्तार यांनी आज अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द देण्यात आल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं होते.मात्र ते पद न मिळाल्याने राजीनामा देत आहे अशी माहिती समोर येत आहे .तर दुसर कारण औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावरुन अब्दुल सत्तार गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर कमालीचे नाराज होते. या नाराजीतूनच आमदार सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा शिवसेना सचिव अनिल देसाई कडे सादर केला आहे .सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अब्दुल सत्तार सातत्याने निवडून येतात, त्या मतदारसंघात मुस्लिम समाजाची निर्णायक मते आहेत. या मतांना सोबत घेऊन इतर समाजाचा विश्वास संपादन करुन अब्दुल सत्तार हे सातत्याने विधानसभेवर निवडून जातआहे .विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसची साथ सोडून अब्दुल सत्तार शिवसेनेत आले होते. अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली आहे . त्यांनी दिलेल्या राजीनामा मूळे एकच खळबळ निर्माण झाली आहे .