प्रतिनिधी
कारंजा , दि. ०५ :- तालुक्यातील आठ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेवारांच्या प्रचारार्थ ४ जानेवारी रोजी ग्राम कामरगाव आठवडी बाजार परिसरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या वतीने कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांचे पुष्पहाराने सामूहिक सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की,जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना जीप व पस निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले पुढे ते आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या की,सर्व जनसामान्य जनतेने आपला विकास साध्य करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थे मध्ये आपली सत्ता असने काळाची गरज असल्याचे त्या म्हणाल्या या प्रसंगी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,काँग्रेस नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी व जिल्हाध्यक्ष दिलीप सरनाईक यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी मंचकावर कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर,माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,काँग्रेस नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी, जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष दिलीप सरनाईक,कामरगाव जीप सर्कल उमेदवार सौ मीना भोने,कामरगाव पस उमेदवार शबाना मैनोद्दीन सौदागर,बेंबला पस उमेदवार हरीश बलंग, धनज जीप सर्कल उमेदवार गजेंद्र कांबळे,धनज पस उमेदवार जिकर मोटलानी,भामदेवी जीप सर्कल उमेदवार राजेंद्र उगले,भामदेवी पस उमेदवार ललिता थोटांगे,येवता पस उमेदवार मोहन कदम,काजलेश्वर जीप सर्कल उमेदवार प्रकाश लिंगाटे,काजलेश्वर पस उमेदवार गजानन गेडाम,शहा पस उमेदवार मंगला लकडे,उंबर्डा जीप सर्कल उमेदवार पुष्पाताई सोनोने,उंबर्डा पस उमेदवार शाहूनन्दा दीघडे,जांब पस सर्कल उमेदवार मोनाली तायडे,धामणी जीप सर्कल उमेदवार उस्मान गारवे,धामणी पस सर्कल उमेदवार माणिक मोखडकर,शेलु पस उमेदवार धम्मानंद देवळे,मनभा जीप सर्कल उमेदवार सौ आशा नरहरी चौधरी, मनभा पस उमेदवार विजय इचे,येवता पस उमेदवार मोहन कदम व कारंजा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष रमेश लांडकर आदींसह पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन विजय देशमुख तथा आभर हमीद शेख यांनी व्यक्त केले.