Home परभणी पोलीस मित्र परिवार समन्वय समिती तर्फे अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त वृक्षारोपण

पोलीस मित्र परिवार समन्वय समिती तर्फे अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त वृक्षारोपण

184

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

परभणी जिल्हातील पाथरी तालुक्यात अण्णा भाऊ साठे जयंती,पोलीस मित्र परीवार समन्वय समिती परभणी व पाथरी विभागाच्या वतीने वृक्षारोपण करुन मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.

पाथरी येथिल कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बांरवाडा रोड,येथे दि.१ आॅगस्ट २०२० ला अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त मा.डॉ. संघपाल उमरे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, व महाराष्ट्र सचिव मा.विनोद पत्रे,मा.अहमद अन्सारी, मराठवाडा अध्यक्ष शेख अजहर हादगावकर, मराठवाड़ा महिला प्रमुख रेखाताई मनेरे,शेख समिर ,जिल्हा सचिव शेख ईफत्तेखार बेलदार यांच्या नेतृत्वाखाली वक्षारोपन,करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष महणुन माझी गट, शिक्षणाधिकारी श्री. मा.अकुंशराव फंड हे उपस्थित होते आणि कार्यक्रमाचे उदघाटन – मा.अलका पंडित, कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय पाथरी मुख्याधापिका यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून मा.सोनाली कजबे ,व सावित्रा दुगाने,कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या पाथरी ग्रह प्रमुख यांची प्रमुख उपस्थितीत, वृक्षारोपण करण्यात आल, झाडाच महत्व मानवाच्या आयुष्यात किती महत्वाच आहे यावर प्रमुख पाहुण्यांनी प्रकाश टाकुन झाडाच महत्व पटवुन दिले. शेवटी सर्वांनी “झाडे लावा, झाडे जगवा हा नारा दिला. या केलेल्या उपक्रमाचे शाळेच्या वतिने समीती बाबत आभार व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचालन पोलीस मित्र परीवार समन्वय समितीच्या मराठवाडा महिला अध्यक्ष मा.रेखा ताई मनेरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुक्ताबाई नामदेव डोंगरे कार्यधयक्ष यांनी केले,योगेश साळवे सौ.रेखा ताई मनेरे व सर्व पोलीस मित्र परीवार समन्वय समितीचे पदधिकारी व महिला पदधिकारी यांनी व मित्र मंडळी यांनी वृक्षारोपण उपक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य व मदत केली.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹