परभणी – माजी आमदार तथा धनगर समाजाचे नेते रामरावजी वडकुते यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळताच धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी मोबाईलवरून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
धनगर समाजाचे नेते माजी आमदार रामराव वडकुते यांची काल कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. रिपोर्ट येताच आमदार वडकुते यांना औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटलमध्ये उपचारात दाखल करण्यात आले. ही बातमी कळताच धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी भ्रमणध्वनीवरून आमदार वडकुते यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांची तब्येत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशा शुभेच्छाही दिल्या. आरक्षण अंमलबजावणीचा लढा पुढे राबविण्यासाठी आमदार वडकुते तात्काळ तंदुरुस्त होऊन समाजात वावरणं आवश्यक असल्याच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.