वर्धा – नारायणपूर ( बंडू बन ) समुद्रपुर तालुक्यातील नंदोरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या आठवड्यापासून रामभरोसे असल्याचे दिसून येते सदर पशुवैद्यकीय दवाखान्यात तिन पदें मंजूर करण्यात आले असून येथील पटटीबंधक श्री पेंडके हे चार महीन्या अगोदर सेवानिवृत्त झाल्याने सदर पद रिक्त आहे तर येथील कार्यरत पशुवैद्यकीय अधिकारी वैद्यकीय रजेवर असल्याने सदर दवाखान्याचा प्रभार गिरड येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांचें कडे आहे गिरड ते नंदोरी हे अंतर ५० की. मी. असल्याने गिरड येथील पशुवैद्यकीय अधिकारी आठवड्यातून एक दोन दिवस नंदोरी पशुवैद्यकीय दवाखान्यात येतात सदर दवाखान्याचा शिपाई सुध्दा वैद्यकीय रजेवर असल्याने सदर दवाखाना उघडन्यासाठी सुध्दा कर्मचारी नसल्याने दवाखाना खाजगी व्यक्ति चा आधार घेत असल्याचे दिसून येते सदर अनियमित पनामुळे परीसरातील शेतकरी गोपालक त्रस्त झाले आहेत कधी कधी तर सदर दवाखान्यात खाजगी डॉक्टर द्वारे जनावरांना उपचार केले जातात तेव्हा या कडे संबंधित अधिकारी तथा लोक प्रतिनिधी यांनी लक्ष देऊन परीसरातील शेतकरी व गोपालकांची अडचण दुर करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.