Home महत्वाची बातमी वर्धा येथे “पत्रकार संरक्षण समिती” च्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन ; विविध...

वर्धा येथे “पत्रकार संरक्षण समिती” च्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन ; विविध मान्यवरांचा सत्कार…!

439

सौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. ०५ :- महाराष्ट्र पत्रकार संरक्षण समिति वर्धा जिह्याच्या वतीने ६ जानेवारी रोजी ‘पत्रकार दिनाचे’ आयोजन मातोश्री सभागृह येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस तर उद्घाटक म्हणून राज्यमंत्री बचू भाऊ कडू उपस्थित राहणार आहे.

प्रमुख अतिथि म्हणून आमदार पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, अभिजीत पाटिल फाळके राहुल-प्रियंका गांधी सेना प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, माजी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश सराफ, समीर देशमुख कार्यक्रमाला येणार असून प्रमुख वक्ते म्हणून तुषार उमाळे, विदर्भ संघटक संभाजी ब्रिगेड उपस्थित राहतील. या कार्यक्रमात पोलिस अधिक्षक बसवराज तेली, जिल्हा माहिती अधिकारी मनीषाताई साळवे, तहसीलदार प्रीति डुडुरकर, पत्रकार संरक्षण समितिचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे, कार्याध्यक्ष शेख सत्तार, अमरावती येथील संघपाल उमरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान खाँ. शेख, सामाजिक कार्यकर्ते विशाल मानकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमात जिल्ह्यातील नामवंत व्यक्ति आणि उत्कृष्ट पत्रकारांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी वर्धा जिल्हा अध्यक्ष रविराज घुमे, सचिव योगेश कांबळे, जिल्हा संघटक दिलीप पिंपळे उपस्थित राहतील. तरी या कार्यक्रमाला जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आव्हाहन उपाध्यक्ष संजय धोंगडे यानी केले आहे.