Home बुलडाणा चॉकलेट देण्याचे अमिष देऊन 60 वर्षीय म्हताऱ्याने केला 9 वर्षीय बालिकेवर बलात्कार

चॉकलेट देण्याचे अमिष देऊन 60 वर्षीय म्हताऱ्याने केला 9 वर्षीय बालिकेवर बलात्कार

240

आरोपीस अटक..!

अमीन शाह

बुलडाणा , दि. ०६ :- जिल्ह्यातील मलकापूर येथील सालीपुरा भागात राहणाऱ्या एका ९ वर्षीय बालिकेवर ६० वर्षीय नराधम वृद्धाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खाऊ देण्याच्या बहाण्याने नराधमाने बालिकेवर अत्याचार केला आहे. पीडित मुलगी ही आरोपी नराधमाला आजोबा म्हणून ओळखत होती. या घटनेमुळे आजोबाच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे. भगवान भोपळे असे त्या नराधम आरोपीचे नाव आहे.

नराधमास अटक

सालीपुरा भागातील 9 वर्षीय बालिका आंगणात खेळत असताना 60 वर्षीय आजोबा चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बालिकेला बोलावून घेतले. त्यानंतर त्याने गाईच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. चॉकलेटच्या बहाण्याने गेलेली ही बालिका या प्रकरणामुळे घाबरून गेली. त्यानंतर झालेला सर्व प्रकार तिने रडत रडत आपल्या आई-वडिलांना सांगितला. हा संतापजनक प्रकार ऐकून घरातील नागरिकांनी तत्काळ मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली.
अत्याचाराची तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी तत्काल आरोपी नराधम भगवान भोपळे याच्या मुसक्या आवळल्या आहेत , पुढील तपास सुरू आहे , प्रिया ढाकणे ( तपास अधिकारी )