Home विदर्भ यवतमाळ जिल्हातील दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु व 24 जण नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ जिल्हातील दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु व 24 जण नव्याने पॉझेटिव्ह

177

पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ , 102 जणांना सुट्टी

यवतमाळ , दि. 5 :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 102 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात दोन कारोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने मृत्युची एकूण संख्या 36 झाली असून आज (दि.5) 24 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे.

बुधवारी मृत झालेल्या दोन जणांमध्ये यवतमाळ शहरातील लक्ष्मीनगर येथील 65 वर्षीय महिला आणि ढाणकी रोड, उमरखेड येथील 75 वर्षीय महिलेचा समावेश आहे. आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये पुसद तालुक्यातील श्रीरामपुर येथील एक पुरुष व पिंपळगाव येथील एक महिला, पुसद शहरातील वसंतनगर येथील तीन महिला व एक पुरूष, उमरखेड शहरातील दोन पुरुष व दोन महिला, नेर तालुक्यातील घारफळ येथील एक महिला, नेर शहरातील तीन महिला, दारव्हा शहरातील एक पुरूष व एक महिला, पांढरकवडा येथील एक पुरूष, यवतमाळ शहरातील नेहरू चौक येथील एक पुरुष व एक महिला, वंजारीफैल येथील एक पुरूष, संजीवनी हॉस्पीटल येथील एक पुरूष, वडगाव येथील एक महिला, विश्वकर्मा नगर पिंपळगाव येथील दोन महिला, पॉझेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात मंगळवारपर्यंत 440 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण होते. यात एकाचा मृत्यु झाल्याने ही संख्या 439 झाली. यात आज नव्याने 25 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे ही संख्या 464 झाली. मात्र यापैकी एकाचा मृत्यु आणि ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या 102 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 361 ऐवढी आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 1309 झाली आहे. यापैकी 912 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 36 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 131 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी 76 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 21732 नमुने पाठविले असून यापैकी 17559 प्राप्त तर 4173 अप्राप्त आहेत. तसेच 16250 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.