बिडकीन – प्रतिनिधी
पैठण , दि. ०६ :- तालुकास्तरावर सगळीकडेच आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांची जयंतीदिनी पञकार दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.त्याच अनुषंगाने बिडकीन येथील शासकीय विश्रामगृहात आज रोजी दि.०६ पञकार दिनानिमित भारतीय दलित संसदेचे वतीने सर्व पञकारांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी अंबादास सगट,विलास काकडे,निकाळजे,रमेश शिंदे,जयराम गायकवाड,संजय शिंदे,विजय शिंदे,सुनिल गायकवाड आदींची उपस्थिती होती.पञकार रविंद्र मावस,रविंद्र गायकवाड,रुषिकेश मुळे,इलियास शेख यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी लो.अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने राबवत असलेली कौशल्य विकासाची माहिती रविंद्र मावस यांनी दिली.कार्यक्रमाचे सुञसंचालन रविंद्र मावस तर आभारप्रदर्शन रविंद्र गायकवाड यांनी केले.