Home बुलडाणा चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास यश नक्कीच मिळते – तहसीलदार बोबडे

चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास यश नक्कीच मिळते – तहसीलदार बोबडे

215

पत्रकार दिनानिमित्त प्रेस क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन….

अमीन शाह

शेगाव , दि. ०७ :- बुलडाणा विद्यार्थ्यांना सतत अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामुळे चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास आपल्याला यश नक्कीच मिळते. प्रत्येक दिवस हा अभ्यासासाठी महत्त्वाचा असतो. कुतूहल आणि कष्ट करण्याची तयारी असल्यास उत्तम गुणवत्ता निर्माण होऊ शकते. गुणवत्ता निर्माण करायची असल्यास प्रामाणिकपणे कष्ट करा. नियोजनबद्ध अभ्यास केल्यास मोठे यश मिळते, असे प्रतिपादन शेगाव चे तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी केले. प्रेस् क्लब शेगाव च्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आणि मराठी पत्रकार श्रुष्टीतील पहिले वृत्तपत्र दर्पण हा प्रकाशित झालेला आहे या निमित्ताने संपूर्ण राज्यभर 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो प्रेस क्लब शेगाव च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये 6 जानेवारी रोजी शहरातील माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
माऊली स्कूल ऑफ स्कॉलर च्या मुख्याध्यापिका मृणालताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास तहसीलदा शिल्पाताई बोबडे, संतनगरीच्या नगराध्यक्ष सौ शकुंतलाताई पांडुरंग बुच, गटशिक्षणाधिकारी पी डी केवट, शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले, ग्रामीण चे ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी, ,प्रेस क्लब संस्थापक संजय सोनोने,अध्यक्ष राजेश चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सर्वप्रथम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर,विद्येची देवता सरस्वती आणि श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये पत्रकार नानाराव पाटील यांनी प्रेस क्लब शेगाव च्या वतीने शहरात राबविला जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत पत्रकार दिना बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर आठव्या वर्गाचा विद्यार्थी आयुष्य कर्णकार याने बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन शैलीवर उपस्थितांना माहिती दिली. यानंतर शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित ठेवले तर यश हमखास मिळेल त्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी ठेवा असे सांगत आपल्या शैक्षणिक दिवसात केलेल्या कठोर परिश्रमाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यानंतर गटशिक्षणाधिकारी प्रकाश केवट, नगराध्यक्षा सौ शकुंतलाबाई बूच यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचलन वर्षा शेंगोकार यांनी तर आभारप्रदर्शन सूरज उंबरकर यांनी केले. या कार्यक्रमाला प्रेस क्लब, शेगावचे सचिव संजय त्रिवेदी, उपाध्यक्ष अविनाश दळवी, कोअर कमिटी सदस्य फहीम देशमुख, नानाराव पाटील,कोषाध्यक्ष धनराज ससाने,संघटक संजय ठाकूर, सतीश अग्रवाल,सहसचिव मंगेश ढोले,पत्रकार डॉ जावेद हुसेन शाह, राजवर्धन शेगावकर, सिद्धार्थ गावंडे,प्रदीप सनान्से, प्रकाश उन्हाळे,प्रशांत खत्री,उमेश शिरसाट, राजकुमार व्यास , ललित देवपुजारी, नितीन घरडे, राजू गाडोदिया, विलास राऊत, सुधाकर शिंदे यांच्यासह माऊली स्कुल ऑफ स्कॉलर्स चे विद्यार्थी शिक्षक शिक्षिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.