गुणवत्तापूर्ण पत्रकारिता करण्याची काळाची गरज – स.सो.खंडाळकर
दर्पण दिनानिमित्त यूवा शक्ती पत्रकार संघटनेने केला 7 जेष्ठ पत्रकारांचा स्मृतिचिन्ह देवून सन्मान
अमीन शाह
औरंगाबाद , दि. ०७ :- सोमवारी मराठी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दर्पण दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
दर्पण दिनानिमित्त यूवा शक्ती पत्रकार संघटनेच्या वतीने 7 जेष्ठ पत्रकारांना स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देवून महापौर नंदकुमार घोडेले व शहरातील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार बालाजी सुर्यवंशी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांना शुभेच्छा संदेश देताना महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी माध्यमे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सकारात्मक पत्रकारीतेची विकासासाठी आज गरज आहे. आपली भूमीका आपल्या लेखनिने ठामपणे लिखान पत्रकार करत आहे. माध्यामांनी राजकारणात यशस्वी होण्यासाठी व महापौर पदाची जवाबदारी असताना शहराच्या विकासासाठी माध्यमांनी सहकार्य केले. माध्यमे समाजाला आरशा दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याने जनतेला न्याय मिळत आहे. जेष्ठ पत्रकार स.सो.खंडाळकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले पत्रकारिता क्षेत्रात नवीन बदल तत्रज्ञानानूसार होत आहे यावरुन पत्रकारांनी बदलायला हवे. सोशलमिडीयाचा प्रभाव वाढत असला तरी स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्तापूर्ण पत्रकारिता करण्याची आजच्या काळाची गरज आहे. सडेतोड लिखाण केले तरी टिआरपि वाढवण्यासाठी तशा बातम्या शोधण्याची जणू स्पर्धा लागली आहे. समाजाचे अनेक प्रश्न आहे ते सोडून इलेक्ट्रॉनिक मिडीया, प्रिंट मिडीयाने एकच विषय धरुन बातम्या चालवल्याने गरीब वंचिंतांचे प्रश्न सुटणार आहे का याचा सुध्दा विचार झाला पाहिजे. असे खंडाळकरांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी अध्यक्षीय भाषणात जेष्ठ पत्रकार बालाजी सुर्यवंशी यांनी पत्रकारीतेची नवोदय पत्रकारांनी फिल्डवर कसे काम करावे काय अनुभव येतो याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजक यूवा शक्ती पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अब्दुल कय्यूम यांचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सत्कार केला. यावेळी जेष्ठ पत्रकार स.सो.खंडाळकर, बालाजी सुर्यवंशी, सुनिलचंद्र वाघमारे, संपादक मुशाहेद सिद्दीकी, आरेफ देशमुख यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ संपादक नायाब अन्सारी, कॉग्रेसचे जेष्ठ नेते इब्राहिम पठाण, जेष्ठ पत्रकार प्रविण बुरांडे, सिटीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार, संपादक सय्यद मोईन, मकसूद अन्सारी,अयूब पटेल उपस्थित होते. दर्पण दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हफीज अली, हसन शाह, अनिस रामपूरे, संजय हिंगोलीकर, गणेश पवार, शकील सिद्दीकी, शकील अहेमद, असरार चिश्ती, अजहरोद्दीन, अथर चिश्ती, अलीम बेग, वसंत बनसोडे, शफी मिर्झा, शेख शफीक, शेख अजीम आदींनी परिश्रम घेतले.