Home जळगाव निंभोरासिमयेथे दरड कोसळुन दोन जणांचा जागेवर मृत्यू झाला असून एक जन जखमी…

निंभोरासिमयेथे दरड कोसळुन दोन जणांचा जागेवर मृत्यू झाला असून एक जन जखमी…

164

शरीफ शेख

रावेर , दि. ०७ :- निंभोरासिमयेथे दरड कोसळुन दोन जणांचा जागेवर मृत्यू झाला असून एक जन जखमी असल्याची घटना सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली आहे यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

प्रत्यक्षदर्शीच्या माहिती नुसार गळ काढण्यासाठी निंभोरासिम विटवा रस्त्या वरील गट नंबर 46 वरील शासकीय बरर्डी वर दीपक सवर्णे वय 20 (निंभोरासिम)सुषानंद सोपन पाटील वय 22 समाधान मरु कोळी वय 20 दोघे राहणार नायगाव हे आपल्या साथी गळ काढण्यासाठी गेले होते गळ काढत असतांना अचानक वरुन दरड कोसळली यामध्ये दीपक सवर्णे,सुषानंद पाटील हे जागीच मृत्यू झाले आहे तर समाधान कोळी हे जखमी झाले आहे सर्वांना रावेर ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले असून येथे नातलक व गावकरयांची एकच गर्दी झाली आहे.