Home सोलापुर लोकमंगल पतसंस्था वागदरी शाखेच्या वतीने पत्रकाराचे सत्कार…!!

लोकमंगल पतसंस्था वागदरी शाखेच्या वतीने पत्रकाराचे सत्कार…!!

157

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट , दि. ०७ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य मराठी पत्रकार संघाचा लोकाभिमुख पत्रकारिता पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे पत्रकार दिना निमित्त लोकमंगल पतसंस्था वागदरी यांच्या वतीने सत्कार करण्यात आले.

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील लोकमंगल पतसंस्थेच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्र प्रमुख बा. ना. चव्हाण हे होते प्रमुख उपस्थिती डॉ. अशोक नडगेरी, विजयकुमार गायकवाड, शाखाधिकारी श्रीकांत तंगशेट्टी,
श्रीकांत सोमवंशी, महेश माने, परमेश्वर पाटील, गुरुनाथ बारगाले,सिध्दाराम शिरगण ,व्हदलुरे गुरूजी आदी उपस्थित होते यावेळी बोलताना केंद्र प्रमुख चव्हाण म्हणाले की , पत्रकार हे लोकशाहीचे चौथा स्तंभ आहे समाजामध्ये घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीना वाचा फोडण्याचे काम लेखणीच्या माध्यमातून केले जाते. या वेळी पत्रकार नागप्पा आष्टगी ,शिवानंद गोगांव व कमलाकर सोनकाबंळे यांचा मानाचा शाल ,पुप्षहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.