पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
औरंगाबाद , दि. ०७ :- ऋचा इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड युनिट नंबर १ प्लॉट नंबर के २४९ एम आय डी सी वाळूज औरंगाबाद येथे आज दिनांक ७ जानेवारी २०२० रोजी वर्ष २० वे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
शिबिराचे उद्घाटन राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार विजेते श्री प्रदीप माळी, प्रा. संजय काळे हस्ते फीत कापून करण्यात आले. सदर प्रसंगी ऑपरेशन हेड विजय बडे श्री परदेशी तसेच प्रशांत पाटील रामराव पाटील लक्ष्मण यमगर अमोल गिरमे विजय शेळके संजय खांडेकर शिवाजी तुरटवाड निलखंठ राठोड संतोष जाधव उपस्थित होते. श्री लक्ष्मण यमगर अमोल गिरमे संजय खांडेकर विजय शेळके प्रकाश बसवंते यांनी रक्तदात्या स रक्तदान करण्यास प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त एचआर विभागाचे प्रमुख श्री लक्ष्मण यमगर तर आभार प्रदर्शन श्री सौरभ यांनी केले.
रक्तपेढीचे संकलन श्री दत्ताजी भाले रक्तपेढी तर्फे करण्यात आले वाळूज औद्योगिक परिसरामध्ये १११ सदस्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी कशी जोपासावी असा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.