Home महत्वाची बातमी मायणी मेडिकल एक आदर्श कॉलेज  – डॉ. राहुल सुर्यवंशी

मायणी मेडिकल एक आदर्श कॉलेज  – डॉ. राहुल सुर्यवंशी

140

मायणी. ता. खटाव – सतीश डोंगरे

सातारा , दि. ०७ :- छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी संचलित रुलर इत्स्टीस्यट ऑफ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर हे अध्यावत नावारूपास आलेले कॉलेज असून या कॉलेजमध्ये सिस्त संस्कार व गुणवत्ता या तीन गुणांचा संगम आहे याच बरोबर येथील विद्यार्थी अहोरात्र कष्ट करून आकाशाला गवसणी घालत तसेच त्याच्याजवळ सामाजिक कार्याची प्रेरणा असल्याने अनेक सामाजिक उपक्रम ते भाग घेतात येथील विद्यार्थी हे उद्याचे भावी डॉक्टर असून निश्चित रुग्णाला याच्या लाभ होईल पश्चिम महाराष्ट्रातील एक आदर्श कॉलेज म्हणून लवकरच नावारूपास येईल असे पष्ट मत शरीर रचना शास्त्राचे पुणे येथील प्राध्यापक डॉक्टर राहुल सूर्यवंशी यांनी मायणी येथे बोलताना व्यक्त केले मायणी येथील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी संचलित मेडिकल कॉलेजच्या 16 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव सौ सोनिया गोरे मॅडम व कार्यक्रमास आदित्य गोरे वैष्णवी गोरे अरुण गोरे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर एम आर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी डॉक्टर सौ आशा नागरे यांनी प्रास्ताविक केले आपल्या प्रस्ताविका वर भाषण संस्थेचा व कॉलेजमध्ये सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला व पुढील कामात कोणते उपक्रम सुरू राहतील याविषयी मनोगत व्यक्त केले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर एम आर देशमुख यांनी संस्था उभी करताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते इतकेच काय परंतु स्वाभिमान विकावे लागते खेडेगावात आपण मेडिकल कॉलेज काढायचे हा ध्यास होता त्याच त्यात जिद्दीवर जीवनात जीव देणारे मित्र होती त्यामुळे हे शक्य झाले माझ्या कॉलेजमधील डॉक्टर झालेल्या माझा विद्यार्थी समाजात ताठ मानेने जगतो आहे समाजाचे ऋण फेडतो आहे हेच माझे धन आहे तसेच नजीकच्या काळात आम्ही एमबीबीएस कॉलेज पुन्हा नव्याने सुरु करणार आहे असे सांगितले संस्थेच्या सचिव सौ सोनिया गोरे यांनी सांगितले की देशमुख साहेबांनी केलेला त्याग कष्ट आम्ही कदापि विसरणार नाही भविष्यात हे कॉलेज पुन्हा डोलाने दिमाखदारपणे उभा राहील यासाठी आम्ही ही रात्रीचा दिवस करनार येथील विद्यार्थी ची गुणवत्ता शिस्तप्रिय व संस्कारक्षम आहेत याचा मला अभिमान आहे यावेळी प्राचार्य आनंदराव आरबुने यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास संस्थेचे संचालक गणेश भिसे, प्राचार्य आनंदराव अरबुने, संचालक संदीप देशमुख, नानासो बरकडे उपप्राचार्य ,आदित्य गोरे देवेंद्र बाशिंगे, सौ डॉक्टर आरती माळी, मारुती शितोळे तसेच विद्यार्थी शिक्षक वर्ग कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित शीतल मॅडम यांनी मान्यवरांचे आभार मानले.