*ग्रामीण विद्यार्थी आभासी शिक्षणापासून वंचित*
४० टक्के विध्यार्थी स्मार्ट फोनविना
प्रतिनिधी:-[ रवि जाधव ]
देऊळगाव राजा:-ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्ट फोन नसल्याने त्यांना शिक्षणापासून वंचीत राहावे लागत आहे.परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याची प्रशासनाने योग्य दखल घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच बाबींना खीळ बसली आहे. दरवर्षी २६ जूनला वाजणारी शाळेची घंटा यावर्षी वाजलीच नाही.त्यामुळे विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून आभासी शिक्षणाचा पर्याय पुढे आला आहे.शहरी भागातील अनेक शाळांनी त्यांची जोरात तयारी सुरू केली आहे. ग्रामीण भागात मात्र जवळपास चाळीस टक्के विद्यार्थ्यांकडे “स्मार्ट फोन”च नाही,लॅपटॉप तर फार दूरची गोष्ट आहे. ज्यांच्याकडे स्मार्ट फोन आहेत, तिथे कधी नेटवर्कची अडचण, तर कधी आर्थिक अडचणीमुळे व्हावचर टाकायला पैसे नसतात.त्यातही संपूर्ण कुटुंबात एखादा स्मार्ट फोन, त्यामुळे तो विध्यार्थ्यांचा हाती लागेलच असे नाही.त्यामुळे अशा अवस्थेत ऑनलाईनचा हा पर्याय ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांसाठी फारसा उपयोगाचा वाटत नाही त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत ग्रामीण आणि शहरी विध्यार्थी अशी ही दरी निर्माण होईल,”’ एवढे मात्र खरे..