” सत्वाचा सागर…. नरहरी सोनार” !एक मुक्त चिंतन…… लिखित ……..
डॉ. मंगलाताई रविंद्र सिन्नरकर (पीएचडी) संत साहित्यिक अभ्यासक यांचे मोलाचे मार्गदर्शन !
आज दि.९ आँगस्ट रोजी ‘मुंबई अहिर सुवर्णकार महाकार्यकारणी’ आयोजित” संत शिरोमणी नरहरी महाराज” जयंती उत्सवाचे आयोजन डिजिटल वेबनार गुगल मीट च्या माध्यमातून आपआपल्या घरी बसून करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात मुंबई आणि मुंबई परिसर,ठाणे, नवी मुंबई, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील समाज बांधवांनी वेबनारच्या माध्यमातून घरी बसून हजेरी लावली होती.
सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचा गाढ्या अभ्यासक समाज भूषण डॉ. मंगलाताई रविंद्र सिन्नरकर (ठाणे) (शिक्षण एम. ए.एम फिल. पी. एच. डी),जन्मबंध चे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर मोरे( माहिम,मुंबई) मुंबई उपनगर येथील प्रकाश खरोटे,पुण्याहून नंदकुमार वडनेरे , उर्मिला ताई पिंगळे यावेळी आँनलाईन उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात “संत नरहरी महाराज “यांच्या प्रतिमेचे पुजन आणि” देवा तुझा मी सोनार”या ध्वनिफीत अभंग वाणीने झाली. यावेळी जन्मबंधचे कार्यकारी अँडमिन सुनील विभांडिक( बदलापूर) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात केले.
डॉ. मंगलाताई रविंद्र सिन्नरकर या ठाणे येथे राहत असून त्या निवृत्त प्राचार्या आहे. जन्मबंध संस्थापक तसेच मुंबई सुवर्णकार महाकार्यकारणी अध्यक्ष प्रभाकर मोरे साहेब यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि.
डॉ. मंगलाताई सिन्नरकर यांचे शिक्षण एम.ए.,एम.फिल., पीएचडी असून संत साहित्याचा त्यांचा गाढ्या अभ्यासक आहे.
“सत्वाचा सागर… नरहरी सोनार”! एक मुक्त चिंतन..
हा ग्रंथ त्यांनी १९९० साली लिहीला .
इ.स.२००० साली मुंबईत “देवा तुझा मी सोनार”आणि “युगबोध” या एकांकिका त्यांनी लिहिली.
“स्वामी स्वरुपानंद पुरस्कार” संत साहित्य सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी मुंबई विद्यापीठातर्फे दिला जाणारा” संत नरहरी महाराज”यांचे ‘अभंगवाड्मय- या त्यांच्या प्रबंधनास मुंबई विद्यापीठाचा ‘स्वामी स्वरूपानंद पुरस्कार’ मिळाला.
“धुंडीसुत मालू “यांच्या पीएचडी प्रबंधास प्रा.अ.का.प्रियोळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सामाजिक संस्था पुरस्कार सन्मानित :–
* डोंबिवली जाएंट्स अवार्ड
*रोटरी क्लब कल्याण
*”प्राचार्य गौरव पुरस्कार
*”समाज भूषण पुरस्कार
*जनकवी “पी सावळा राम” पुरस्कार
यानंतर उपस्थित सर्वांना उत्सुकता होती डॉ. मंगला रविंद्र सिन्नरकर यांचे मनोगत ऐकण्याची.
यावेळी त्यांनी सांगितले कि,संतांची पुण्यतिथी,अथवा जयंती संतांची प्रेरणा म्हणून साजरी करावी.
सन फेब्रुवारी१९८६साली संत नरहरी महाराजांच्या सातशे व्या पुण्यतिथीनिमित्त पंढरपूर महाद्वार येथे साजरा झालेल्या सोहळ्याप्रसंगी आठवडाभर सहभागी होते. त्यावेळी मठ मंदिरांना भेटी, रामबागेतील संत नरहरी महाराज मठाला भेट, संत साहित्य अभ्यासक यांच्या भेटी घेतल्या. यानंतर संत नरहरी महाराज मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर तसेच संत नामदेव महाराजांचे घर यांना भेटी दिल्या. मुंबई विद्यापीठाकडून ‘स्वामी स्वरुपानंद पुरस्कार’ प्राप्त झाला. त्याच ग्रंथांच्या आधारित त्यांना” सत्वाचा सागर…नरहरी सोनार”! एक मुक्त चिंतन.. हे ढवळे प्रकाशनतर्फे १९९० साली प्रकाशित झाले. “मालुतारण”ग्रंथाच्या आधारे संत नरहरी महाराजांच्या ६०पिढ्यांच्या इतिहास प्राप्त झाला.रामचंद्र सदाशिव सोनार हे मुळ पुरुष होय.
सहाव्या व सातव्या शतकापर्यंत चालत आलेली विठ्ठल मंदिर,मल्लिकार्जुन मंदिराची व्यवस्था रामचंद्र वंशज बघत .
संत नरहरी महाराजांचे दहावे वंशज “धुंडीसुत मालू” यांच्या वरील प्रबंधनास प्रा.अ.कां.प्रियोळकर हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार २००१साली प्राप्त झाला .संत नरहरी महाराज्यांच्या आयुष्यात क्रांती घडवणारा हरिहरेक्याचा साक्षात्कार ,कटीसुत्राचा प्रसंग, त्यानंतर ते शिवभक्ती कडुन विठ्ठलभक्तीकडे वळले. संत नरहरी महाराजांचे अभंग गाथेत एकूण ४०अभंग आहे. मठ,मंदिरे, ग्रंथालये ,व्यक्ती यांना भेटी देऊन गावोगावी फिरून संत नरहरी महाराजांचे एकूण ८०च्या वर अभंग शोध यात्रेतून कसे मिळाले ते उलगडून सांगितले.
*डॉ. मंगलाताई रविंद्र सिन्नरकर या गेली ३५वर्षांपासून संत नरहरी महाराज* *यांच्या जीवनचरित्त्रावर व्याख्याने देत आहे.* समाज बांधव मोठ्या संख्येने आँनलाईन उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्यकारी अँडमिन सुनिलजी विभांडिक यांनी केले.