Home महत्वाची बातमी यवतमाळात भाजपा व शिवसेना नेत्यांमध्ये मोठा राडा

यवतमाळात भाजपा व शिवसेना नेत्यांमध्ये मोठा राडा

144

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. ०८ :- शिवसेना व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी बंडखोरी केल्यामुळे निवडणुकी दरम्यान गदारोळ झाला .

यवतळमामध्ये आज पंचायत समिती सभापती, उपसभापती पदासाठीच्या निवडणुकीत शिवसेना व भाजपा नेत्यांमध्ये राडा झाला. यावेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये हाणामारी आणि धक्काबुकी झाल्याची चर्चा यवतमाळ शहरात चांगलीच गाजत आहे. शिवसेना व राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी बंडखोरी केल्यामुळे निवडणुकी दरम्यान गदारोळ झाला . काही काळासाठी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

यवतमाळ पंचायत समिती मध्ये शिवसेना – ४ , भाजप – २ , काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. महाविकास आघाडी आणि भाजपा असा सामना रंगला. पण ऐनवेळी राष्ट्रवादीचा सदस्याने भाजपा सोबत घरोबा केला. सदर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेतील एका महिलेला आपल्या पाठिंब्यासाठी तयार केले होते. आज निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाचे नेते मंडळी शिवसेनेच्या त्या महिलेला घेऊन पंचायत समितीच्या आवारात येताच राडा झाला. शिवसेना कार्यकर्त्यांनी त्या महिलेला जाब विचारला. याच कारणावरून भाजपा व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच झुंपली. दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की , शिवीगाळ व रेटारेटी झाली.

राष्ट्रवादीचे सदस्य नरेश ठाकूर हे भाजपवासी झाले. तर शिवसेनेच्या नंदाबाई लडके या देखील भाजपाच्या गोटात सामील झाल्या. दरम्यान भाजपाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल गट आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड या नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत केल त्यामुळे राजकारण शांत झालं.