सतीश डोंगरे
मायणी / सातारा – मायणी तालुका खटाव येथे असणाऱ्या ब्रिटिश कालीन तलावावर परदेशी फ्लेमिंगो व इतर पक्ष्यांचे आश्रयस्थान असल्याने मायणी सह कानकात्रे ,येरळवाडी ,सुर्याचीवाडी तलाव क्षेत्रात लवकरच पक्षी संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा प्राप्त होणार असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक डॉक्टर व्ही .क्लेमेंट बेल यांनी दिली.
मायणी येथे ब्रिटिश कालीन तलावअसून1896 च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या देखरेखीखाली या धरणाचे काम पूर्ण झाले आहे. या तलावातील पाणीसाठ्यामुळे व बाजूच्या वनसंपदेमुळे इथे प्लेमिंगो सह बरेच पक्षी आश्रयासाठी येतात. त्यांचे संरक्षण व संवर्धन होण्याच्या दृष्टीने सातारा येथील मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांचे प्रयत्नाने प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानुसार मायणी पक्षी आश्रयस्थान शाश्वत विकास साधून पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने मायणी येथील ग्रामस्थ व पक्षीप्रेमी नागरिक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी परिसरातील नागरिक व पक्षी प्रेमी उपस्थित होते याविषयी त्यानुसार सदर प्रस्ताव शासनाकडून लवकरच मंजूर होऊन मायणी येथील पक्षी आश्रयस्था चा विकास करण्यात येणार असल्याचे बेल यांनी स्पष्ट केले याविषयी ग्रामस्थांचे उद्बोधन करून हक्क सुरक्षित ठेवण्याबाबत सांगण्यात आले यावेळी डॉ श्यामसुंदर मिरजकर, माजी उपसरपंच सुरज पाटील, दादासाहेब कचरे , पोपट मिंड ,बाळासाहेब कांबळे, अंकुश चव्हाण, राजाराम कचरे इत्यादींनी मनोगत व्यक्त केले.
येथील ब्रिटिशकालीन तलाव परिसरातील जुन्या बागेची झालेली पडझड पाहून या बागेस उजाळा देण्यासाठी मायणीतील युवक दत्ता कोळी व सागर घाडगे यांनी वनविभागाची रीतसर परवानगी घेऊन बागेच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले .त्यांच्या या सामाजिक कार्यात मायणीतील राज सामाजिक संस्था,शिवनेरी ग्रुप,जगदंब ग्रुप,सह्याद्री ट्रेकर्स ग्रुप,विनायक दुर्गामाता ग्रुप,मानवाधिकार संघटना,भूमाता ब्रिगेड,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,वजीर ग्रुप यांनीही सहभाग नोंदवला सुमारे दीड महिन्याच्या कालावधीत याठिकाणची जुनी बाग सुंदर रित्या स्वच्छ होऊन या परिसराला गतवैभव मिळाले. परिसराचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला आहे.
आज कोल्हापूर प्रादेशिक वनविभागचे प्रमुख डॉ बेन व्ही. क्लेमेंट (मुख्य वन संरक्षक) ,सातारा उपवनसंरक्षक डॉ भारतसिंग हाडा यांचेसह अन्य प्रमुख अधिकाऱ्यांनी मायणी पक्षी आश्रयस्थान याठिकाणी भेट देऊन स्थानिक युवक व नागरिकांच्या केलेल्या कामाचे कौतुक करीत हा सर्व परिसर आणखी निसर्गरम्य करण्याकामी यशस्वी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य रणजीत माने ,मा संजीवन चव्हाण सहायक उपवनसंरक्षक सातारा ,मा शीतल फुंदे वनक्षेत्रपाल वडूज ,काश्मीर शिंदे वनपाल मायणी ,संजीवनी खाडे वनरक्षक मायणी,मुंडे साहेब वनरक्षक कलेढोण,पारधी प्रकाश वनरक्षक पाचवड ,संजय गुदगे,प्रा.विकास कांबळे,मिलिंद देशमुखे,श्रीकांत सुरमूख,सागर माळी, सूरज माळी व ग्रामस्थ उपस्थित होते.