शरीफ शेख
रावेर , दि. ०९ :- ७ जानेवारी रोजी संविधान बचाओ समीती तर्फे जो महा मोर्चा काढण्यात आला होता व तो अभूत पूर्व यशस्वी झाल्याने व गुरुवारी त्यास माध्यमाने उचित न्याय दिल्याने त्या ५५ संघटनाचा सर्व दूर अभिननदं होत आहे
या ५५ संघटनेत जळगाव ची मुस्लिम मंच संघटनेचा समावेश असल्याने त्या संघटनेचे संस्थापक व समन्वयक फारूक शेख यांनी त्या सर्व ५४ संघटना सह संविधान बचाओ कृति समिति, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया चे सुद्धा आभार मानले.
मुस्लिम मंच चे नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून साखळी उपोषण जिल्हा अधिकारी कार्यालया बाहेर रोज सकाळी ११ ते २ वाजे पर्यन्त सुरु असून गुरुवारी त्यांचा १७ वा दिवस आहे तरी यात जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थीती द्यावी असे आव्हान फारूक शेख यांनी एका पत्रका द्वारे केले आहे.