Home मराठवाडा पत्रकार दिनाचे औचित्य साधून सिंदखेड पोलीसांच्या वतीने पत्रकार दिन साजरा

पत्रकार दिनाचे औचित्य साधून सिंदखेड पोलीसांच्या वतीने पत्रकार दिन साजरा

213

मजहर शेख

पत्रकार दिनानिमित्य सिंदखेड पोलीस ठाण्यात पेन व डायरी स्वरूपात भेट देवून पत्रकारांचा सन्मान…!!

नांदेड / माहूर , दि. ०९ :- पत्रकार दिनाचे औचित्य साधून सिंदखेड पोलीसांच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार संरक्षण कायद्याच्या माध्यमातून पत्रकारांच्या संरक्षणार्थ पोलीस प्रशासन कटीबद्ध असल्याची ग्वाही देत सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षकांनी देत पत्रकारांचा सन्मान केला.
दि.८ रोजी. जेष्ठ पत्रकार रशीद फाजलानी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात सिंदखेड पोलीसांच्या वतीने सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मल्हार शिवरकर यांनी दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून त्यांच्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकत दर्पन दिनाची माहीती स्पष्ट केली. तसेच सर्वसामान्यांना आपल्या लेखणीतून न्याय देण्यासाठी अविरत झगडणा-या पत्रकारांना पत्रकार संरक्षण कायद्याच्या माध्यमातून पोलीस प्रशासन सदैव तत्पर असल्याची ग्वाहीही उपस्थित पत्रकारांना दिली. यावेळी पेन व डायरी स्वरूपात भेट देवून पत्रकारांना गौरविण्यात आले. दरम्यान जेष्ठ पत्रकार राजकुमार पडलवार यांनी आपल्या प्रास्ताविकेतून उपस्थितांना मार्गदर्शन करताना इंग्रज सरकारच्या विरोधात स्वातंत्र्याची मशाल प्रज्वलित करण्यासाठी सुरू केलेल्या ‘दर्पन’ या पहिल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून दर्पनकारांच्या कार्यास उजाळा दिला. तर पत्रकार कैलाश बेहेरे यांनी बोलताना शहरी पत्रकारांच्या तुलनेत ग्रामीण भागातील पत्रकारांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. किंबहूंना ग्रामीण पत्रकारांना येणा-या अडचणी शहरी पत्रकारांना येत नसल्याने सहाय्यक पोलीस निरिक्षक मल्हार शिवरकर यांनी पत्रकार संरक्षण कायद्याच्या माध्यमातून संरक्षण देण्याची दिलेली ग्वाही म्हणजे पत्रकारांना स्फुरण चढवणारी बाब असल्याचे म्हटले.
सिंदखेड पोलीस ठाण्यात मागील चार वर्षांपासून पत्रकारांच्या सन्मानार्थ साजरा केल्या जात असलेल्या पत्रकार दिनाच्या सन्मान कार्यक्रमाबाबत बोलताना अजयकुमार कंधारे यांनी सिंदखेड पोलीस ठाण्याच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सपोनि शिवरकर यांच्याबाबत गौरवोद्गार काढले. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या पत्रकारांच्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले. तर पत्रकार प्रवीण बिराजदार यांनीही उपस्थीतांना मार्गदर्शन करताना अनेक बाबींना उजाळा देत ग्रामीण पत्रकारांना काम करताना आलेल्या अडचणींची समिक्षा केली. न्यायालयापुर्वी प्रकरणांतील ख-या बाबी उजेडात आणून निरपराधाना तपास न्याय देण्यासाठी न्यायालयात सत्य मांडणारे प्राथमिक न्यायालय म्हणजे पोलीस ठाणे असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी जेष्ठ पत्रकार रशीद फाजलानी, राजकुमार पडलवार, कैलाश बेहेरे, अजयकुमार कंधारे, मजहर शेख, फिरोज पठाण, प्रविण बिराजदार आदी पत्रकारांसह पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मल्हार शिवरकर, एन.पी.सी. गोपनवाड, पठाण, पो.कॉ. गजानन नंदगावे, संघरत्न सोनसळे, शेंडे इत्यादी पोलीस कर्मचारी व नागरीकांची उपस्थिती होती.