अमीन शाह
अमरावती , दि. ०9 :- काही महिन्यापासून अमरावती शहरातील मोटरसायकल चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती पोलिसांनी सातत्याने केलेल्या तापासमुळे 9 मोटारसायकल चोरांना अटक करण्यात आलीअसून त्यांच्याकडून तब्बल 49 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
अमरावती शहरातील मोटारसायकल चोरीच्या प्रमाणात झालेली वाढ नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली होती तर शहर पोलिसांसाठी नामुष्की, मागील 2 महिन्यात तर चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती प्रामुख्याने शहर कोतवाली राजपेठ आणि गाडगे नगर या 3 पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोटारसायकल चोरीचे प्रमाण अधिक होते पोलिसांनी अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने या चोरीच्या घटनेचा तपास करून आतापर्यंत 49 मोटरसायकल जप्त केल्या असून 9 आरोपीना अटक केली आहे.
ज्यामध्ये सिटी कोतवाली हद्दीतील 24 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून 7 आरोपी अटक आहेत तर राजपेठ पोलिसांनी 25 मोटरसायकल जप्त केल्या असून 2 आरोपींना अटक केली आहे चोरी केलेल्या गाड्या फायनस कंपनीच्या जप्त केल्या गाड्या आहे असं फसवं सांगून ग्राहकांना विकत असे महागड्या गाड्या कमी किमतीत मिळत असल्याने ग्राहक ते घ्यायचे मात्र पोलीसानि मात्र या गाड्या विक्री व खरेदी होत असल्याची सूत्र मिळाली आणि या प्रकरणाचा पर्दाफाश झाला लगेच आरोपी ना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली व यामध्ये आरोपिकडून 49 गाड्या ज्याची किंमत 12 लाख 80 हजार इतकी आहे आरोपी ची अजून कसून चौकशी सुरू आहे मा पोलीस आयुक्त यांनी यावेळी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले की नागरिकांनी अशा नवीन गाड्या कमी किंमतीत मिळत असेल तर त्याची बारकाईने विचारपूस करून ती घ्यावी व यामध्ये जर त्या चोरीच्या आढळलयास पोलिसांना माहिती द्यावी असे आव्हाण करण्यात आले आहे .